जिनिव्हात सध्या सुरू असलेली सीरियाची शांतता चर्चा अडखळत पुढे जात असल्याने अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सीरियाचे अध्यक्ष बाशर अल् आसाद यांच्या राजवटीवर नव्याने दबाव टाकण्याची रणनीती आखण्याचे ठरविले आहे.
जॉर्डनचे राजे अब्दुल्ला (दुसरे) यांनी ओबामा यांना दिलेल्या एका मेजवानीप्रसंगी ओबामा यांनी उपरोक्त सूतोवाच केले. सीरियातील पेचप्रसंगाच्या लक्षणांवर केवळ आपण आणि जॉर्डनचे राजे उपचार करू शकत नाही. आसाद यांच्या राजवटीने निर्माण केलेल्या समस्यांवरही आम्हाला तोडगा शोधावा लागेल. सीरियातील पूर, तेथील निर्वासितांनी जॉर्डनमध्ये केलेले स्थलांतर आदी मुद्दय़ांचा संदर्भ ओबामा यांच्या भाषणात होता.

Story img Loader