पाकिस्तानने दहशतवाद्यांची चांगले आणि वाईट अशी विभागणी करू नये, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबमा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना सांगितले. शरीफ आणि ओबामा यांच्यात गुरूवारी झालेल्या चर्चेदरम्यान ओबामांनी दहशतवादाविरुद्धची अमेरिकेची भूमिका स्षष्ट केली. पाकिस्तानने दहशतवादी संघटनांची विभागणी न करण्याचाविषयी ओबामा आग्रही आहेत. अमेरिकेची पूर्वीपासून या भूमिकेवर ठाम आहे. शरीफ यांच्याबरोबरच्या कालच्या चर्चेत ओबामा यांनी ही भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केल्याचे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले.
पाकिस्तान नेहमीच त्यांच्यासाठी निरूप्रदवी ठरणाऱ्या दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याचे टाळत आल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर ओबामा आणि शरीफ यांच्यात तब्बल ९० मिनिटे चाललेल्या चर्चेचा बहुतांश रोख दहशतवादाकडेच होता. अमेरिका आणि पाकिस्तान हे दोन्ही देश दहशतवादाच्या समस्येशी झगडत आहेत. पाकिस्तानी जनतेला या सगळ्याची मोठी झळ सोसावी लागत आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा लोकशाही आणि नागरी व्यवस्था प्रस्थापित करण्याच्यादृष्टीने अमेरिका आणि पाकमधील संबंध दीर्घकाळ टिकणे महत्त्वाचे असल्याचेही ओबामांनी यावेळी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा