अर्थसंकल्पीय खर्चात ८५ अब्ज डॉलरची कपात करणाऱ्या आदेशावर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्वाक्षरी केली असून त्यामुळे वृद्धीदरात अर्धा टक्का कपात होणार असून त्यापोटी ७५ हजार रोजगाराच्या संधींची किंमत मोजावी लागणार आहे.
अर्थसंकल्पीय कपातीबाबत आणि तुटीवर कशी मात करावयाची, याबाबत रिपब्लिकन पार्टीच्या नेत्यांमध्ये एकमत होऊ शकले नाही त्यामुळे काहीशा नाराजीनेच ओबामा यांनी स्वाक्षऱ्या केल्या. आपल्याकडील उद्योगसमूहांना मोठय़ा प्रमाणावर नव्या कामगारांना भाडय़ावर आणण्याची वेळ आली आहे, अमेरिकेत नोकरीच्या नव्या संधी येऊ लागल्या असताना आपण ज्यावर उद्योग अवलंबून आहेत, कामगार अवलंबून आहेत अशा गोष्टींमध्ये कपात करता नये, शिक्षण, संशोधन, पायाभूत सुविधा आणि संरक्षण यामध्ये कपात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. हे अनावश्यक आहे आणि अमेरिकेतील अनेक जण रोजगाराच्या संधी शोधत असताना ही कृती अक्षम्य ठरेल. या सर्वाचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होईल. माफी आणि मोबदल्यात कपात म्हणजे लोकांच्या खिशात कमी पैसा खुळखुळेल आणि स्थानिक व्यापारावर खर्च करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा राहणार नाही, असेही ते म्हणाले. याचा परिपाक म्हणजे कमी नफा आणि अर्थव्यवस्थेवर ताण पडणार असून ७५ हजार नोकऱ्यांची किंमत मोजावी लागणार आहे आणि हे रिपब्लिकनांमुळे होणार आहे. हे आवश्यक नव्हते; परंतु तोच पर्याय पक्षातील काँग्रेसजनांनी निवडला, असेही ते म्हणाले.

Story img Loader