अमेरिकेच्या अध्यक्षपदावर दुसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर बराक ओबामा या महिनाअखेरीस आपला पहिला परदेश दौरा दक्षिण आशियामधील बर्मा, कंबोडिया, थायलंड या राष्ट्रांपासून सुरू करणार आहेत. त्यांच्यासमवेत या दौऱ्यामध्ये संरक्षण सचिव लिओन पॅनेटा आणि परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटनदेखील सहभागी होणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले. दक्षिण आशियासंबंधी ओबामा प्रशासनाच्या बदलत्या दृष्टिकोनाचा दाखलाच या प्रस्तावित भेटीमुळे समोर आला आहे.
१७ ते २० नोव्हेंबर रोजी कंबोडिया येथे होणाऱ्या पूर्व आशियाई राष्ट्रांच्या शिखर परिषदेमध्ये ओबामा सहभागी होणार आहेत. त्यानंतर बर्मा आणि थायलंड या राष्ट्रांना ते भेट देणार असल्याचे व्हाइट हाऊसतर्फे स्पष्ट करण्यात आले. थायलंडच्या पंतप्रधान यिंगलक यांची भेट घेऊन ओबामा उभय राष्ट्रांमधील १८० वर्षांच्या जुन्या राजनैतिक मैत्रीला वृद्धिंगत करणार असल्याचे व्हाइट हाऊसचे प्रवक्ते जे कार्नी यांनी स्पष्ट केले. म्यानमारचे (बर्मा) अध्यक्ष आणि लोकशाहीवादी नेत्या आँग सान स्यू की यांची भेट या दौऱ्याचे मुख्य आकर्षण असून, तेथे ते आपले विचार मांडणार आहेत. आर्थिक प्रगती, व्यापारवृद्धीतून तयार होणारी रोजगारनिर्मिती, ऊर्जा आणि संरक्षण सहकार्य, मानवी हक्क, प्रादेशिक आणि जागतिक प्रश्नांवर या भेटीमध्ये आशियाई राष्ट्रांशी चर्चा होणे अपेक्षित असल्याचेही कार्नी यांनी नमूद केले.
ओबामा आशिया भेटीवर
अमेरिकेच्या अध्यक्षपदावर दुसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर बराक ओबामा या महिनाअखेरीस आपला पहिला परदेश दौरा दक्षिण आशियामधील बर्मा, कंबोडिया, थायलंड या राष्ट्रांपासून सुरू करणार आहेत. त्यांच्यासमवेत या दौऱ्यामध्ये संरक्षण सचिव लिओन पॅनेटा आणि परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटनदेखील सहभागी होणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-11-2012 at 05:16 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Obama visit asia