अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मंगळवारी रात्री दूरध्वनीवरून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबद्दल माहिती दिली. उभय नेत्यांमध्ये मंगळवारी रात्री हॉटलाईनवरून चर्चा झाली. तुर्कस्तानात पुढील आठवड्यात होणाऱया जी-२० परिषदेची आम्ही दोघेही वाट पाहात असल्याचे मोदींनी सांगितले. आम्ही दोघांनीही एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तसेच व्हाईटहाऊसवर दिवाळी साजरी केली जाते हे ऐकून आनंद झाल्याचेही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा