लोकसभेच्या ओबीसी कल्याण समितीच्या बैठकीत मागणी
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीनिमित्त हिवाळी अधिवेशनात दोन दिवस विशेष चर्चा घेणाऱ्या केंद्र सरकारवर महात्मा फुलेंच्या स्मरणार्थदेखील विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी ओबीसी संवर्गातील खासदारांनी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवडय़ात झालेल्या लोकसभेच्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) कल्याण समितीच्या बैठकीत याच मुद्दय़ावर सर्व सदस्यांचे एकमत झाले. समितीतील एका सदस्याने महात्मा फुलेंच्या कार्याचा गौरव करीत सरकार ओबीसींच्या हिताकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला. डॉ. आंबेडकरांचे कार्य महान आहे, परंतु त्यांचे गुरू महात्मा फुले हेच होते. त्यांच्यापासून डॉ. आंबेडकरांनी प्रेरणा घेतली होती. महात्मा फुले ओबीसी नेते आहेत. त्यांच्या कार्य व कर्तृत्वाचा आढावा घेण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. अधिवेशन केव्हा घ्यावे, यावर मात्र शिक्कामोर्तब होऊ शकले नाही, असा दावा समितीतील एका सदस्य खासदाराने केला.
महात्मा फुलेंच्या नावाने विशेष अधिवेशन?
महत्त्वाचे म्हणजे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार घोषित करण्यात यावा.
Written by टेकचंद सोनवणे
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-12-2015 at 02:40 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Obc welfare committee demand special session in the name of mahatma phule