हैदराबादमधील एका विद्यार्थ्याला वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हिमांक बन्सल असं मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचं नाव असून तो हैदराबादमधील IFHE मध्ये कायद्याचं शिक्षण घेत आहे.

याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याने ११ नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली आहे. संबंधित तक्रारीनुसार, ही घटना १ नोव्हेंबर रोजी घडली असून घटनेच्या दिवशी १५ ते २० जणांनी पीडित विद्यार्थ्याला वसतिगृहाच्या खोलीत शिरून त्याचा शारीरिक आणि लैंगिक छळ आहे, असं पीडित विद्यार्थ्यानं तक्रारीत म्हटलं आहे.

RG Kar Rape-Murder Case
RG Kar Rape-Murder Case : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात मोठी अपडेट! पीडितेच्या वकिलाची खटल्यातून माघार; सांगितलं ‘हे’ कारण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mira Road Riot Case, Bail to 14 Muslim Youths,
मीरा रोड दंगल प्रकरण : १४ मुस्लिम तरुणांना उच्च न्यायालयाकडून जामीन
young woman abandoned her newborn near Vanzra Layout Nagpur
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO
school girl and her brother molested by minors who threatened to kill her
जिवे मारण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य, अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल
man murder over property dispute, Mumbai ,
मुंबई : मालमत्तेच्या वादातून ३६ वर्षीय व्यक्तीची हत्या, दोघांना अटक
UP Court Grants Bail to Teacher in Muslim Student Assault Case
वर्गातील मुलाला मुस्लिम विद्यार्थ्याच्या कानाखाली मारायला सांगणाऱ्या शिक्षिकेला न्यायालयाकडून जामीन

हेही वाचा- मुंबईत ‘हॅटमॅन किलर’ची चर्चा, ‘त्या’ व्हायरल VIDEOवर पोलिसांनी दिलं स्पष्टीकरण

संबंधित विद्यार्थ्यांनी पीडित विद्यार्थ्याला धक्काबुक्की करत चुकीची वागणूक दिली. तसेच त्याच्या चेहऱ्यावर, गालावर, पोटात लाथा-बुक्क्या आणि चापटीने मारहाण केली आहे. एवढंच नव्हे तर आरोपींनी पीडित विद्यार्थ्याच्या गुप्तांगांला स्पर्श करत त्याला काही रसायने आणि पावडर बळजबरीने खाऊ घातली, असं तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान, एका आरोपी विद्यार्थ्याने आपल्या तोडांत गुप्तांग घालण्याचा प्रयत्न केला. तसेच कपडे फाडून नग्नावस्थेत मारहाण केल्याचा आरोपही पीडित विद्यार्थी बन्सलने केला आहे. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’नं दिलं आहे.

या घटनेचे संतापजनक व्हिडीओज आणि फोटोज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. याप्रकरणी ११ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी पीडित विद्यार्थ्याला धमकावलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली असून रॅगिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

Story img Loader