- चांद्रमोहीम फत्ते करणारा भारत आंतरग्रहीय मोहिमांसाठी किती सक्षम आहे हे या मोहिमेद्वारे तपासले जाईल
- पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाचा वापर करून एखादे यान मंगळाच्या कक्षेत पोहचविणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. या तंत्रज्ञानाचा वापर पुढे इतर ग्रहांच्या अभ्यास मोहिमांसाठी करता येऊ शकतो.
- डीप स्पेस नेटवर्कच्या साह्याने अवकाशातील यानाला नियंत्रित करणे, तसेच डीप स्पेस नेटवर्कचा वापर करणे
- तब्बल दहा महिन्यांच्या प्रवासानंतर योग्यवेळी तात्पुरती बंद करण्यात आलेली यंत्रे पृथ्वीवरून पुन्हा योग्यवेळी चालू करणे. हे तंत्रज्ञानदेखील पुढील आंतरग्रहीय मोहिमांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे समजले जाते.
- मंगळाच्या वातावरणाचा योग्य अभ्यास करणे आणि इतर देशांच्या मोहिमांतून सुटलेल्या काही मु्द्द्यांचा अभ्यास करणे.
- मंगळावरील पाणी व कार्बन डायऑक्साईड -हासाची कारणे शोधणे.
भारताच्या मंगळ मोहिमेची उद्दिष्टे…
चांद्रमोहीम फत्ते करणारा भारत आंतरग्रहीय मोहिमांसाठी किती सक्षम आहे हे या मोहिमेद्वारे तपासले जाईल
First published on: 05-11-2013 at 10:29 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Objectives of indias mars mission project