कर्नाटकमधील सेक्स टेप प्रकरणी आरोपी प्रज्वल रेवण्णाला आज पोलिसांनी बंगुळूरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली होती. तसेच त्याला आज विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान, न्यायालयाने आता त्याला आता ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा – “जर पीडिता स्वत:च माध्यमांसमोर…”, स्वाती मालिवाल प्रकरणातील जनहित याचिका न्यायालयानं …

Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
Bangladesh husband and wife, Pimpri-Chinchwad,
पिंपरी-चिंचवडमधून बांगलादेशी पती-पत्नीला अटक; एटीबीची कारवाई, आठ दिवसांपासून हॉटेलमध्ये…
Two arrested on charges of kidnapping and demanding Rs 25 lakhs
अपहरण करून २५ लाखांची मागणी केल्याच्या आरोपाखाली दोघांना अटक
Suspect related to Babbar Khalsa arrested from Mumbai NIA takes action
बब्बर खालसाशी संबंधित संशयीताला मुंबईतून अटक, एनआयएची कारवाई
minor girl posted her video with boyfriend on Instagram
नागपूर : अल्पवयीन प्रेयसीने ‘इंस्टाग्राम’वर व्हिडिओ टाकला अन् प्रियकर अडकला…
Puja Khedkar news
Puja Khedkar : पूजा खेडकरला अटक होण्याची शक्यता, दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज

महिन्याभरापूर्वी सेक्स टेप प्रकरण उजेडात आल्यानंतर प्रज्वल रेवण्णाने भारतातून पळ काढला होता. तसेच तो जर्मनीत असल्याची माहिती पुढे आली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याने एक व्हिडीओ शेअर करत आपण ३१ मे रोजी भारतात आत्मसमर्पण करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार प्रज्वल रेवण्णा आज सकाळी भारतात दाखल झाला.

दरम्यान, रेवण्णा भारतात दाखल होताच कर्नाटक पोलिसांच्या विशेष पथकाने त्याला बंगुळूरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक केली. त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. तसेच त्याला विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

हेही वाचा – आचारसंहितेच्या काळात ध्यानधारणा करुन मोदींनी आचारसंहितेचे उल्लंघन केलंय का?…

नेमकं प्रकरण काय?

जवळपास महिन्याभरापूर्वी कर्नाटकमधील मतदानानंतर हे सगळं प्रकरण उघड झालं. प्रज्वल रेवण्णाच्या ड्रायव्हरनंच या सगळ्या क्लिप असणारा पेनड्राईव्ह पोलिसांच्या हवाली केला होता. त्यानंतर पोलिसांनी प्रज्वल रेवण्णाचा शोध सुरू केला. मात्र, तोपर्यंत तो विदेशात फरार झाला होता. त्याच्याविरोधात लुकआऊट नोटिसाही काढण्यात आल्या होत्या. गेल्या महिन्याभरात त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नव्हता. तसेच, त्याच्याकडून या संपूर्ण प्रकरणावर कोणतंही भाष्य किंवा बाजू मांडण्यात आली नव्हती.

Story img Loader