भारताच्या अॅस्ट्रोसॅट या अवकाश निरीक्षण वेधशाळेने पहिले छायाचित्र पाठवले असून ते भारतीय अवकाश संस्था म्हणजे इस्रोने ट्विटरवर प्रसारित केले आहे. बहुतरंगलांबीच्या अॅस्ट्रोसॅट वेधशाळेने टिपलेले हे छायाचित्र अतिदीप्त नवताऱ्याच्या (सुपरनोव्हा) अवशेषांचे आहे. त्यात खेकडय़ाच्या आकाराचा तेजोमेघ (नेब्यूला) दिसत आहे. हे छायाचित्र शुक्रवारी घेण्यात आले असून तो तेजोमेघ हा प्रखर क्ष किरण सोडणारा आहे. इस्रोच्या ब्लॉग पोस्टवर म्हटले आहे की, हा तेजोमेघ अॅस्ट्रोसॅटला प्रथम कक्षेतून दिसला नाही, कारण ही वेधशाळा त्यावेळी दक्षिण अटलांटिक भागातून जात असावी. साउथ अॅटलांटिक अॅनोमली (एसएए) म्हणजे अवकाशातील बम्र्युडा ट्रँगल (जेथे वस्तू दिसत नाहीत असा भाग) असून त्यामुळे खगोलशास्त्रीय निरीक्षणात अडथळे येतात. इलेक्ट्रॉनिक प्रणाली व संगणक, अवकाशयानातील भाग पुरेशा क्षमतेने काम करीत नाहीत. अगोदर अॅस्ट्रोसॅट वेधशाळा या भागातून जात असताना सर्व उपकरणे बंद करण्यात आली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा