ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या अडचणी वाढत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. सन २०२० मध्ये देशात करोना निर्बंध लागू केलेले असताना त्यांनी डाउनिंग स्ट्रीट येथील गार्डनमध्ये आपल्या कार्यालयामधील कर्मचाऱ्यांसोबत पार्टी केल्याची माहिती समोर आलीय. यानंतर जॉन्सन यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढताना दिसतोय. विरोधी पक्षाने पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केलीय. दरम्यान ब्रिटनमधील एक प्रमुख सट्टा कंपनी असणाऱ्या ‘बेटफेअर’ने केलेल्या दाव्यानुसार या नवीन वादात अडकलेले बोरिस जॉन्सन लवकरच पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊ शकतात. त्यानंतर भारतीय वंशाचे मंत्री ऋषि सुनक (Indian Origin Rishi Sunak as Next British PM Boris Johnson to Resign) यांची वर्णी पंतप्रधानपदी लागू शकते.

‘बेटफेअर’ने दिलेल्या माहितीनुसार मे २०२० मध्ये करोना लॉकडाउनच्या कालावधीत पंतप्रधान कार्यालयातील डाउनिंग स्ट्रीटमध्ये झालेल्या ड्रिंक पार्टीसंदर्भात समोर आल्लेल्या माहितीनंतर बोरिस जॉन्सन अडचणीत आलेत. ५७ वर्षीय बोरिस जॉन्सन यांना विरोधी पक्षाबरोबरच स्वपक्षीय नेत्यांकडूनही विरोध केला जातोय, असं सांगण्यात येत आहे. त्यामुळेच आता भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना पंतप्रधान केलं जाऊ शकतं अशा चर्चा ब्रिटनच्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात.

Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Challenges facing by political parties in Maharashtra state assembly elections 2024
लक्षवेधी लढत : प्रतिष्ठा, अस्तित्व आणि वर्चस्वाची लढाई
mayura kale vs sumit wankhede arvi assembly constituency election
लक्षणीय लढत : खासदार पत्नी विरुद्ध फडणवीसांचे विश्वासू असा सामना
congress leader ashok gehlot slams pm modi over batenge toh katenge remarks
पंतप्रधानांकडून ‘एक है, तो सेफ है’च्या घोषणा हे देशाचे दुर्दैव; काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांचा आरोप
Thackeray said Modi being Vishwaguru cant avoid mentioning his name
मोदी विश्वगुरू असले तरी माझे नाव घेतल्याशिवाय त्यांना… उद्धव ठाकरे यांचा टोला
Who will be Chief minister if Mahayuti wins
महायुतीचा विजय झाल्यास मुख्यमंत्री कोण होणार? भाजपाकडून मिळालेले ‘हे’ संकेत महत्त्वाचे

कोण कोण आहे शर्यतीमध्ये?
जॉन्सन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधीपक्षाबरोबरच त्यांच्या पक्षाचे नेतेही दबक्या आवाजात करत आहेत. ‘बेटफेअर’च्या सॅम रॉसबॉटम यांनी ‘वेल्स ऑनलाइन’ला दिलेल्या माहितीनुसार जॉन्सन यांना हटवण्यात आल्यास ४१ वर्षीय ऋषि सुनक यांना पंतप्रधान बनवलं जाण्याची सर्वाधिक शक्यता आहे. सुनक यांच्या खालोखाल परराष्ट्र मंत्री लिज ट्रूस आणि कॅबिनेट मंत्री मायकल गोव यांच्या नावांचाही पंतप्रधान पदासाठी विचार होऊ शकतो असं सांगितलं जातंय. तसेच या शर्यतीमध्ये माजी परराष्ट्र मंत्री जेरेमी हंट, भारतीय वंशाच्या गृहमंत्री प्रीति पटेल, आरोग्य मंत्री साजिद जाविद आणि कॅबिनेट मंत्री ओलीवर डॉउडेन यांचाही समावेश आहे.

आधी नकार नंतर माफी…
याआधीच बोरिस जॉन्सन यांनी या प्रकरणासंदर्भात माफी मागितलीय. मात्र त्यापूर्वी जेव्हा हे प्रकरण समोर आलं तेव्हा त्यांनी आपला याच्याशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलं होतं. नंतर त्यांनी या पार्टीत आपण हजर असल्याचं मान्य केलं होतं. अखेर त्यांनी ही पार्टी म्हणजे आपल्या कार्यालयीन कामाचा भाग असल्याने आपण तिथे उपस्थित राहिलो होतो, अशी सारवासारव केलीय. मागील काही दिवसांमध्ये ब्रिटनच्या राजकीय वर्तुळाबरोबरच प्रसारमाध्यमांमध्ये या प्रकरणाची तुफान चर्चा आहे. आधी नकार आणि नंतर थेट माफी यामुळे आता या प्रकरणावरुन पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जातेय.

काय आहे प्रकरण?
जॉन्सन यांनी सन २०२० मध्ये करोना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये डाउनिंग स्ट्रीटच्या गार्डनमध्ये आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांसोबत पार्टी केल्याचा दावा ब्रिटनमधील आयटीव्हीने केलाय. एकीकडे नागरिकांना घरांमधून बाहेर निघण्यावरही निर्बंध लादणाऱ्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली असतानाच दुसरीकडे पंतप्रधान मात्र पार्टी करत होते असं या वृत्तात म्हटलंय. या पार्टीच्या आमंत्रण पत्रिकांचा ईमेलच समोर आला असून मे २०२० मध्ये पंतप्रधानांच्या डाउनिंग स्ट्रीट कार्यालय आणि सरकारी निवासस्थानी ‘सोशली डिस्टन्स ड्रिंक्स’ नावाखाली पार्टीचं आयोजन करण्यात येत असल्याचे ईमेल या वृत्तवाहिनीने समोर आणलेत. या प्रकरणानंतर आता विरोधी पक्षाने पोलीस तपासाची मागणी केलीय.

ज्या दिवशी पोलिसांची नियमावली आली त्याच दिवशी पार्टी…
पंतप्रधानांचे खासगी सचिव मार्टिन रेनॉल्ड्स यांनी अनेकांना ईमेल पाठवून ही माहिती दिली होती. ही पार्टी २० मे २०२० रोजी झाली. याच दिवाशी झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये लोकांना करोना निर्बंधांची आठवण करुन देताना सरकारी यंत्रणांनी घराचा सदस्य नसणाऱ्या केवळ एकाच व्यक्तीला भेटण्याची परवानगी नवीन नियमांनुसार देण्यात आली आहे, अशी आठवण करुन दिली होती. लंडन पोलिसांनी याच दिवशी करोना निर्बंधांची नवीन नियमावली जारी केली होती. मार्च २०२० पासून सुरु झालेल्या लॉकडाउनमध्ये अंत्यसंस्कार आणि काही महत्वाची कामं वगळता इतर ठिकाणी लोकांनी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आलेली. याच कालावधीमध्ये पंतप्रधानांनी या पार्टीचं आयोजन केलं होतं. ही पार्टी ‘ब्रिंग युआर ओन बुझ’ म्हणजेच ‘स्वत:च स्वत:च्या पसंतीची दारु घेऊन पार्टीला यावे’ या पद्धतीने आयोजित करण्यात आलेली.

नाताळाच्या पार्ट्यांचंही आयोजन
जॉन्सन यांच्या कन्झर्व्हेटीव्ह सरकारवर आरोप करण्यात आला आहे की त्यांनी नियमांचं उल्लंघन केलं. इतरांवर लागू केलेले निर्बंध सरकारने पाळले नाहीत असं विरोधकांचं म्हणणं आहे. वरिष्ठ अधिकारी सुए ग्रे यांना यापूर्वी सरकावर करण्यात आलेल्या करोना नियमांच्या उल्लंघनांच्या आरोपांचा तपास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलं होतं. त्यांच्याकडेच नुकत्याच करण्यात आलेल्या आरोपांच्या तपासाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे केवळ २० मे २०२० चीच पार्टी नाही तर २०२० मध्ये नाताळाच्या पार्ट्याही आयोजित करण्यात आल्याचे आरोप केले जात आहेत.