ओदिशातील कंधमाळ लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी बीजेडीने माजी खासदार हेमेंद्र सिंग यांच्या पत्नी प्रत्युशा राजेश्वरी सिंग यांना पक्षातर्फे उमेदवारी दिली आहे. माजी खासदार हेमेंद्र सिंग यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती.
हेमेंद्र सिंग यांचा मतदारसंघात चांगला प्रभाव होता. त्यांच्या पत्नी कंधमाळमधील जनतेसाठी उत्तम कार्य करतील आणि आपल्या पतीप्रमाणेच मतदारसंघात काम करतील, असा विश्वास ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी व्यक्त केला. नवीन पटनाईक यांनी आपल्यावर विश्वास दाखविल्याबद्दल प्रत्युशा राजेश्वरी सिंग यांनी त्यांचे आभार मानले आहेत. पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करू, असे राजेश्वरी सिंग म्हणाल्या.

Story img Loader