Chennai Coromandel Express Accident : ओडिशा राज्यात शुक्रवारी(२ जून) रात्री रेल्वेचा भीषण अपघतात झाला. ओडिशामधील बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनजवळ तीन रेल्वेंचा विचित्र अपघात झाला. या अपघातात २३८ जणांनी जीव गमावला आहे. तर, ९०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की मदत आणि बचावकार्य करणाऱ्या एनडीआरएफच्या पथकाला गॅस कटरच्या मदतीने मृतदेह काढावे लागत आहेत. या भीषण अपघातातून बचावलेल्या रेल्वेतील एक प्रवाशाने भयानक अनुभव सांगितला आहे.

एएनआयशी बोलताना प्रवाशी म्हणाला, “मी सालीमार ते चेन्नई असा प्रवास करत होतो. रेल्वेचा अपघात झाला तेव्हा मी झोपलो होतो. अचानक मला जाग आली. खूप जोरात आवाज येत होते. माझी सीट वरच्या बाजूस होती. सीटच्या वरील पंखा पकडून मी बसलो होतो. ट्रेन थांबल्यानंतर आम्ही खाली उतरलो. ट्रेनमधून बाहेर आल्यानंतर सगळे इकडे तिकडे पळत होते. जीव वाचवण्यासाठी लोक मदत मागत होते. पण आम्ही कोणाकोणाला मदत करणार. कोणाचे हात नाहीत, कोणाचे पाय नाहीत, कुणाचं डोकं नाही…सगळे असे पडलेले दिसत होते.”

Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर
Shocking viral video of ac local train crowd in Mumbai air conditioned local trains are disappointing shocking video goes viral
एसी ट्रेनचं तिकीट काढताय? मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवरचा ‘हा’ VIDEO पाहून धडकी भरेल; पाहा नेमकं काय घडलं?
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
biker dies due to speeding bike falls from bridge
भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पुलावरून कोसळली, दुचाकीस्वाराचा मृत्यू

हेही वाचा>> Odisha train accident : “कुणाचा हात कापला गेला तर कुणाचा पाय….” कोरोमंडल एक्स्प्रेसच्या प्रवाशाने सांगितली आपबीती

“आम्ही ट्रेनच्या एस ५ या डब्ब्यातून प्रवास करत होतो. तेव्हा आमचे जीव वाचवायला ही कोणी नव्हतं…आम्ही स्वत:च ट्रेनमधून बाहेर पडलो. खूप भयानक परिस्थिती होती. ट्रेनमधील प्रवासीच एकमेकांचे जीव वाचवत होते. आम्ही खूप घाबरलो होतो. काय करावं ते सूचत नव्हतं. आमच्या सीटच्या खाली एक दोन वर्षांचा मुलगा होता. पण, सुदैवाने त्याला काहीही झालं नाही. नंतर त्या मुलाला त्याच्या कुटुंबीयांकडे सुखरुप पोहोचवलं,” असं म्हणत सुखरुप बचावलेल्या प्रवाशाने धक्कादायक अनुभव सांगितला.

अपघात कसा झाला?

कोरोमंडल एक्स्प्रेस ट्रेन क्रमांक १२८४१ चे कोच बी २ ते बी ९ हे डबे रुळावरुन घसरले. त्यानंतर बी १ हा कोच आणि इंजिनही रुळावरुन घसरलं. त्यानंतर मालगाडीची टक्कर झाली. जे लोक एसी बोगीमध्ये बसले होते त्या प्रवाशांचा मृत्यू मोठ्या प्रमाणावर झाला आहे असंही रेल्वेच्या प्रेस रिलिजमध्ये म्हटलं आहे. हावडा मेलची ही टक्कर या दरम्यान झाली. एनडीआरएफ आणि लष्कराने मदत आणि बचावकार्य सुरु केलं आहे.