ओदिशाचे आरोग्यमंत्री नाबा किशोरदास यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली आहे. ओदिशातल्या झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगर जवळ त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर नाबा दास यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे असं सांगण्यात येतं आहे.
नेमकं काय घडलं?
एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ओदिशाचे आरोग्यमंत्री नाबा दास आले होते. त्यावेळी ते कारमधून उतरल्यानंतर त्यांच्यावर गोळ्या चालवण्यात आल्या. ASI ने त्यांच्यावर फायरिंग केलं. या पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्यावर गोळी का झाडली ते समोर आलेलं नाही. यानंतर तातडीने नाबा दास यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव आहे.
ओदिशात मंत्र्याची पोलिसाकडून हत्या; घटनेच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
नाबा किशोरदास यांच्यावर हा हल्ला होणं हा पूर्वनियोजित कट होता. कारण त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्न निर्माण झाला आहे. ओदिशाचे कॅबिनेट मंत्री नाबा दास यांच्यावर गोळीबार करणाऱ्या ASI चे नाव गोपाल दास आहे असंही समजतं आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोपाल दास यांनी नाबा दास यांच्यावर ४ ते ५ गोळ्या झाडल्या. ही घटना घडल्यानंतर नाबा दास यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.