Odisha Liquor Ban or insurance for drunkards Sanatan Mahakud : देशातील काही राज्यांमध्ये संपूर्ण दारुबंदी आहे. यामध्ये बिहार, गुजरात, मिझोरम आणि नागालँड या राज्यांचा समावेश आहे. आता ओडिशामधून अशीच मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, बिजू जनता दल (बीजेडी) पक्षाचे आमदार सनातन महाकुद यांनी नवी मागणी केली आहे. महाकुद यांनी ओडिशात संपूर्ण दारूबंदी करावी किंवा मद्यपींसाठी विमा योजना चालू करण्याची मागणी केली आहे. त्यांनी त्यांच्या मागणीसंदर्भात उत्पादन शुल्क विभागाकडे लेखी निवेदन मागितलं आहे.

“ओडिशा सरकार राज्यात दारुबंदीच्या कोणत्याही प्रस्तावावर विचार करतंय का?” असा प्रश्न महाकुद यांनी उत्पादन शुल्क विभागाला विचारला आहे. तसेच ते म्हणाले, “सरकारकडे दारुबंदीसंदर्भात कोणतीही योजना नसल्यास त्यांनी मद्यपींचा विमा काढण्याची योजना आणावी किंवा मद्यपींना आरोग्य विम्यांतर्गत संरक्षण देण्याची तरतुद करता येईल का?” दरम्यान, महाकुद यांच्या मागणीवर उत्पादन शुल्क मंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी लेखी उत्तर दिलं आहे. हरिचंदन यांनी म्हटलं आहे की, “सरकारकडे अशी कोणत्याही प्रकारची योजना नाही”.

Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो
Narendra Modi statement that Congress wants to end OBC reservation
काँग्रेसला ओबीसी आरक्षण संपवायचे -मोदी
Dr Abhijeet and Dr Gauri Desais research for brown skin in America
… मोहे शाम रंग दई दे
mukkampost bombilwadi mazi ladki janta yojna
मुक्कामपोस्ट बोंबिलवाडीची ‘लाडकी जनता योजना!’, पोस्ट होतेय व्हायरल, काय आहे ही योजना? वाचा…
Goa Boycott Viral Post man called tourist trap for inflation and dirty beaches debate broke out
“गोवा म्हणजे पर्यटकांना जाळ्यात अडकवण्याचा सापळा”, गोव्यातील पर्यटनावर युजर्सचा संताप; म्हणाले, ‘घाणेरडे…
Anil Ambani Company Banned
Anil Ambani: अनिल अंबानींना मोठा धक्का; रिलायन्सच्या कंपनीवर तीन वर्षांसाठी बंदी, शेअर गडगडले

हे ही वाचा >> Bishnois : हरियाणाची निवडणूक पुढे ढकलण्यामागे तीन जिल्ह्यांतला बिश्नोई समाज आणि ३०० वर्षांपासूनच्या उत्सवाची परंपरा

महाकुद मागणीचा पाठपुरावा करणार

उत्पादन शुल्क मंत्री हरिचंदन यांनी दिलेल्या उत्तरावर महाकुद यांनी प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले, मी आमदार म्हणून माझ्या विशेषाधिकाराचा वापर करून राज्याचे मुख्यमंत्री, उत्पादन शुल्क मंत्री व मुख्य सचिवांना राज्यात संपूर्ण दारुबंदी करण्याबाबत किंवा मद्यपींसाठी विमा योजना आणण्याबाबत पत्र लिहिणार आहे.

हे ही वाचा >> Howrah Hospital : पश्चिम बंगालच्या रुग्णालयात आणखी एक धक्कादायक प्रकार, सीटीस्कॅन केंद्रात अल्पवयीन मुलीचा कर्मचाऱ्याकडून विनयभंग!

…म्हणून सरकार दारूबंदी करत नाही : सनातन महाकुद

सनातन महाकुद म्हणाले, मी याआधी देखील राज्यात संपूर्ण दारूबंदी करण्याची मागणी केली आहे. मात्र सरकारने ती मागणी फेटाळत म्हटलं की दारूबंदी करता येणार नाही. कारण त्यातून राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मात्र दारूमुळे अल्पवयीन मुलांसह अनेकांचं जीवन उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे मी नेहमीच मद्यविक्रीचा विरोध केला आहे.

हे ही वाचा >> Uttar Pradesh : लखनौमधील विद्यापीठात विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, वसतीगृहात आढळला IPS अधिकाऱ्याच्या मुलीचा मृतदेह

ओडिशातील सर्वात श्रीमंत आमदार

६७ वर्षीय महाकुद हे खनिजसंपन्न अशा केओंझारमधील चंपुआ मतदारसंघाचे आमदार आहेत. ते ओडिशामधील सर्वात श्रीमंत आमदारांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे २२७ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं त्यांनी निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केलं होतं.