आधी एक मृतदेह आढळून आला त्यानंतर दुसरा त्यानंतर आता तिसरा. बारा दिवसांमध्ये तीन रशियन पर्यटकांचे मृतदेह भारतात आढळले आहेत. योगायोगाची बाब ही हे तिन्ही मृतदेह ओदिशामध्ये आढळले. आधी सापडलेले दोन मृतदेह एका हॉटेलमध्ये तर तिसरा मृतदेह जहाजात सापडला. या रशियन पर्यटकांच्या मृत्यूचं गूढ उकललेलं नाही.

२२ डिसेंबर २०२२ ला काय घडलं?

ओदिशातल्या दक्षिण बागात असलेल्या रायगढा या ठिकाणी सकाळी सकाळी एका विदेशी पर्यटकाचा मृत्यू झाला. या पर्यटकाचं नाव व्लादिमीर बेदेनोव असं होतं. रशियाचे हे पर्यटक आपल्या हॉटेलच्या खोलीत होते. तिथे ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. हॉटेलच्या स्टाफने त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल केलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ६१ वर्षीय बेदेनोव हे आपल्या तीन रशियन मित्रांसह २१ डिसेंबरला या हॉटेलमध्ये आले होते. आपल्या मृत्यूपूर्वी ते मोठ्या प्रमाणावर मद्य प्राशन करत होते. त्यामुळे पोलिसांनी हा प्राथमिक अंदाज लावला की जास्त मद्य पान केल्याने बेदेनोव यांचा मृत्यू झाला असेल. या घटनेकडे फारसं लक्षही वेधलं गेलं नाही. हॉटेल साई इंटर नॅशनलमध्ये ही घटना घडली.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
Union Health Minister confirms sudden deaths in India are not caused by COVID-19 vaccines, addressing public concerns about vaccine safety.
Deaths Due To Corona Vaccine : “करोना लशीमुळे झाले नाहीत लोकांचे मृत्यू”, मोदी सरकारने संसदेत सांगितली अचानक मृत्यूंमागील कारणे
Bengaluru
Bengaluru : धक्कादायक! पत्नीच्या जाचाला कंटाळून अभियंता पतीने गळफास घेऊन जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये पत्नीवर केले गंभीर आरोप
number of ST bus accidents increased in Nashik division
नाशिक विभागात एसटी अपघातांचा उंचावता आलेख; नऊ महिन्यांत बसचे १२० अपघात, २२ जणांचा मृत्यू

२४ डिसेंबर २०२२ हॉटेल साई इंटरनॅशनल, ओदिशा

बेदेनोव यांच्या मृत्यूनंतर बरोबर दोन दिवसांनी म्हणजेच २४ डिसेंबरला या प्रकरणाने आणखी एक वळण घेतलं. रशियातले खासदार आणि श्रीमंत व्यावसायिक पावेल एंटोव यांचा साई इंटरनॅशनमध्येच संशयास्पद मृत्यू झाला. पावेल यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सापडला. त्यांना त्या अवस्थेतही रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दोन दिवसांच्या अंतराने दोन रशियन पर्यटकांचा मृत्यू ओदिशामधअये होणं याकडे सगळ्या जगाचं लक्ष वेधलं गेलं.

३ जानेवारी २०२३ ला मिळाला तिसरा मृतदेह

या दोन मृत्यूंनंतर दहा दिवसांनी म्हणजेच ३ जानेवारी २०२३ ला तिसरा मृतदेह आढळला. हा मृतदेह हॉटेल साई इंटरनॅशलमध्ये नाही पण त्यापासून दूर असलेल्या प्रदीप पोर्टमध्ये आढळला. मिलायकोव सर्गे असं या रशियन पर्यटकाचं नाव होतं. हा पर्यटक पेशाने इंजिनिअर होता. ज्या जहाजावर या पर्यटकाचा मृतदेह आढळला ते जहाज बांग्लादेशहून चिटगाव पोर्ट तिथून ओदिशातलं प्रदीप पोर्ट आणि तिथून मुंबईला चाललं होतं. या जहाजात एकूण २३ जण होते. जहाजाच्या चेंबरमध्ये मिलायकोव यांचा मृतदेह सापडला.

पोलिसांकडून निष्काळजीपणा

२२ आणि २४ डिसेंबरला दोन रशियन पर्यटकांचे मृतदेह रशियात आढळले. तर तिसरा मृतदेह ३ जानेवारीला आढळला. या तीन मृत्यूंचं गूढ जितकं आहे तेवढेच प्रश्न पुढच्या कारवाईबाबतही उपस्थित होतात. कारण पोलिसांनी एका स्मशानात नेऊन २२ आणि २४ डिसेंबरला मिळालेले मृतदेह जाळले. पोस्टमॉर्टेमनंतरचेव्हिसेरा नमुनेही सांभाळून ठेवले नाहीत. ज्या ठिकाणी मृतदेह आढळले त्या ठिकाणाकडेही दुर्लक्ष केलं गेलं. हे का झालं याची उत्तरं मिळणं बाकी आहेत.

या तीन मृत्यूंमध्ये परस्पर संबंध काय असू शकतो?

या तीन मृत्यूंमध्ये परस्पर संबंध काय असू शकतो याचा विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर रशियातले पत्रकारही शोधत आहेत. त्याचप्रमाणे अमेरिका, ब्रिटन आणि युरोपमध्येही सध्या याच प्रश्नांची चर्चा होते आहे. खासदार पावेल एंटोव हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे विरोधक होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू कसा झाला तसंच इतर मृत्यू कसे झाले यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

काय घडलं होतं डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात?

बेदेनोव आणि एंटोव हे दोघेही मिखाइल तुरोव आणि त्यांची पत्नी नातालिया यांच्यासोबत भारतात आले होते. या सगळ्यांसोबत दिल्लीतला एक ट्रॅव्हल एजंट जितेंद्र सिंहदेखी होती. मिळालेल्या माहितीनुसार हे सगळेजण सोमवार १९ डिसेंबरला दिल्लीहून भुवनेश्वरला आले. तिथे आल्यानंतर काही ग्रामीण भागांमध्ये ते फिरले. त्यानंतर २० डिसेंबरला कंधमाल येथील हिलस्टेशन असलेल्या दारिंगबाडीलाही गेले. बुधवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास ते रायगढा या ठिकाणी पोहचले आणि साई इंटरनॅशनल मध्ये त्यांनी चेक इन केलं.

या घटनेनंतर दोन मृत्यू दोन दिवसांच्या अंतराने झाले. बेदेनोव हे बेशुद्ध अवस्थेत सापडले तर रशियाचे खासदार एंटोव यांचाही मृत्यू झाला. पोस्टमॉर्टेमचा जो अहवाल आला त्यात बेदेनोव यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला. तर एंटोव यांचा मृत्यू का झाला ते अद्याप समजू शकलेलं नाही. आज तकने या संबंधीचं वृत्त दिलं आहे.

या प्रकरणात तिघांची चौकशी सुरू

या मृत्यू प्रकरणात ओदिशा पोलिसांच्या गुन्हे शाखेने तीन जणांची चौकशी सुरू आहे. ज्यामध्ये रशियाचे दोन नागरिक आणि एक ट्रॅव्हल एजंट अशा तिघांचा समावेश आहे. या तिघांनाही आधी रायगढा या ठिकाणी आणण्यात आलं. आधी गुन्हे शाखेचे आय.जी. अमितेंद्र नाथ यांनी या तिघांची प्रदीर्घ चौकशी केली. तर आता या तिघांना कटकमध्ये आणण्यात आलं आहे. या तिघांची चौकशी आता कटकमध्ये सुरू आहे. या पैकी कुणालाही क्लिन चीट देण्यात आलेली नाही.

Story img Loader