या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओडिशा येथील बालासोर या ठिकाणी झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघातात शेकडो प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातात तीन ट्रेन्सची धडक झाली होती. यातली एक मालगाडी होती तर इतर दोन प्रवासी ट्रेन होत्या. या अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. अपघातात चूक कुणाची? हा देखील प्रश्न उपस्थित होत होता. अशात बालासोरचा भीषण रेल्वे अपघात टाळता आला असता असा अहवाल रेल्वे बोर्डाने दिला आहे. अपघाताच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने अपघातासंदर्भातल्या महत्त्वाच्या बाबी उघड केल्या आहेत.

अपघाताचं मुख्य कारण काय?

रेल्वे सुरक्षा आयोगाने (CRS) रेल्वे बोर्डाकडे स्वतंत्र अहवाल सादर केला आहे. सिग्नलच्या कामात बिघाड होता, त्रुटी होत्या. बाहानागा बाजार स्टेशन या ठिकाणी दोन समांतर रुळांना जोडणाऱ्या स्विचमध्ये त्रुटी होत आहेत हे जर स्टेशन प्रबंधकांनी लक्षात आणून दिलं असतं तर तशी पावलं उचलली गेली असती. मात्र सिग्नल यंत्रणेतला बिघाड हे अपघाताचं मुख्य कारण होतं असं या अहवालात म्हटलं गेलं आहे.

रेल्वे बोर्डाला सादर केलेल्या स्वतंत्र चौकशी अहवालात असं नमूद करण्यात आलं आहे की सिग्नलिंगच्या कामात कमतरता असल्यामुळे अपघात झाला. तर बहनागा बाजार स्टेशन या स्थानकावरच्या लेव्हल क्रॉसिंग गेट ९४ वर इलेक्ट्रिक लिफ्टिंग बॅरियर बदलण्यात आली नव्हती. त्यातही त्रुटी आढळल्याचं म्हटलं आहे.

ओडिशाच्या रेल्वे अपघातात २९० प्रवाशांच्या मृत्यू

ओडिशातील बालासोर येथे तीन ट्रेनची धडक होऊन भीषण अपघात घडला. ओडिशातील बालासोर येथे २ जून झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. या अपघातात आत्तापर्यंत २९० जणांचा मृत्यू झाला तर, एक हजाराहून अधिक लोक गंभीर जखमी झाले. हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या अपघातांपैकी एक आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Odisha train accident balasore incident indian railway report expose signal problem scj
Show comments