Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर रेल्वे दुर्घटनेने अख्खा देश हादरला आहे. या दुर्घटनेत तब्बल २८८ प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे, तर १,१०० हून अधिक प्रवासी यात जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. विरोधी पक्ष या घटनेवरून सरकारवर आणि रेल्वे मंत्रालयावर आरोप करत आहेत. दरम्यान, काँग्रेसनेही सरकारवर हल्लाबोल केला आहे. या दुर्घटनेनंतर काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री भक्त चरण दास यांनी एक पत्रकार परिषद घेऊन रेल्वे विभागाच्या बेजबाबदारपणावर बोट ठेवलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माजी केंद्रीय मंत्री भक्त चरण दास म्हणाले, अलिकडच्या काळात अशी रेल्वे दुर्घटना कधीच झाली नाही. या दुर्घटनेत शेकडो लोकांनी जीव गमावला. तर एक हजारहून अधिक लोक या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. भक्त चरण दास यांनी दावा केला आहे की, दुर्घटनेनंतर हजारो रेल्वे प्रवाशांनी त्यांच बूक झालेलं रेल्वेचं तिकीट रद्द केलं आहे. कारण त्यांना वाटतं की, रेल्वेने प्रवास करणं आता सुरक्षित नाही.

हे ही वाचा >> “…तर मी राजकारण सोडेन”, कृपाल तुमानेंच्या ‘त्या’ आरोपांवर अजित पवार संतापले

भक्त चरण दास यांचा व्हिडीओ काँग्रेसने ट्विटरवर शेअर केला होता. हा व्हिडीओ रिट्वीट करून इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) काँग्रेसला उत्तर दिलं आहे. यात आयआरसीटीसीने म्हटलं आहे की, खरंतर हा दावा चुकीचा आहे. तिकीट रद्द करण्याचं प्रमाण वाढलेलं नाही. उलट तिकीट रद्द करण्याचं प्रमाण घटलं आहे. ०१ जून रोजी ७.७ लाख तिकीटं रद्द करण्यात आली होती. तर ०३ जून रोजी ७.५ लाख तिकीटं रद्द करण्यात आली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Odisha train accident congress claims ticket cancellation increased irctc said this is factually incorrect asc