भुवनेश्वर : ओडिशा सरकारने बाहानगा येथील ६५ वर्षे जुनी शाळेची इमारत पाडण्याचा निर्णय घेऊन ती पाडण्यास सुरुवात झाली. नुकत्याच येथे झालेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह या शाळेत तात्पुरते ठेवले गेले होते.  त्या ठिकाणी नवी इमारत बांधली जाईल. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शाळेच्या व्यवस्थापन समितीने सांगितले, की  इमारत जुनी झाल्याने असुरक्षित झाली होती. तसेच  रेल्वे अपघातातील मृतदेह  ठेवल्याने विद्यार्थी शाळेत येण्यास तयार नव्हते. पालकांनीही ही इमारत पाडण्याची मागणी केली होती. त्यामुळे ही शाळा पाडण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी गुरुवारी पुनर्बाधणीला मंजुरी दिली.