कच्च्या तेलाचे दर वेगाने खाली जात असल्यामुळे तेल कंपन्यांनी पेट्रोलचा दर प्रतिलिटर २.४२ रुपयांनी आणि डिझेलचा २.२५ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. दर कमी करतानाच पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करात दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासूनचे नवे दर लागू होणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कच्चा तेलाचे दर सातत्याने घसरत आहेत. काही महिन्यांपूर्वी प्रतिबॅरल १०० डॉलरपेक्षा जास्त असलेले कच्च्या तेलाचे दर आता ५० डॉलरच्याही खाली गेले आहेत. कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल ३० डॉलरपर्यंत खाली उतरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला.

Story img Loader