इस्रायल-हमास, इस्रायल-हेझबोला यांच्यातील युद्धानंतर आता इस्रायल-इराण युद्ध पेटलं आहे. इराणने मंगळवारी (१ ऑक्टोबर) रात्री इस्रायलची राजधानी तेल अविववर मोठा हल्ला केला आहे. इराणने इस्रायलवर २०० बॅलिस्टिक क्षेपणास्रे डागल्यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे या संघर्षाचा परिणाम कच्चा तेलाच्या किंमतीवर बघायला मिळतो आहे. इराणच्या हल्ल्यानंतर कच्चा तेलाच्या किंमतीत जवळपास ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

इराणच्या हल्ल्यानंतर कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ

रॉटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात ग्लोबल बेंचमार्क ब्रेंट क्रूडचे दर २.६ टक्क्यांनी म्हणजेच १.८६ डॉलरने वाढून ७३.५६ डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. तर वेस्ट टेक्सॉस इंटरमीडिएट क्रूडचे दर प्रति बॅरल २.४ टक्क्यांनी म्हणजे १.६६ डॉलरने वाढून ६९.८३ डॉलरने पर्यंत वाढले आहेत. या हल्ल्याचा परिणाम फक्त क्रूड ऑईलवरच नाही, तर शेअर बाजारावरही पडला आहे. जगभरातील अनेक शेअर बाजारात घसरण झाल्याचं बघायला मिळालं आहे.

17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
moody forecasts indian economy
मूडीजला ७.२ टक्के अर्थवेगाचा विश्वास
Daily Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरांत काय आहे दर?
edible oil import india
खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्याच्या घोषणा हवेतच ! जाणून घ्या, एका वर्षात किती खाद्यतेलाची आयात झाली आणि त्यासाठी किती रुपये मोजले
india s industrial production rises 3 1 percent in september
कारखानदारी क्षेत्राचे ऑगस्टमधील उणे स्थितीतून सकारात्मक वळण , सप्टेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन दरात ३.१ टक्क्यांची वाढ
How to check daily Petrol And Diesel rates
Petrol Diesel Rates In Maharashtra : पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा इंधनाचा दर
petrol diesel price today in marathi
Price of Petrol And Diesel : पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? तुमच्या शहरातील आजचे दर येथे चेक करा

हेही वाचा – Israel Iran War : इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या मदतीसाठी अमेरिकेची धाव; जो बायडेन यांचे सैन्याला आदेश, म्हणाले…

भारतातही पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता

साधारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव वाढले, तर त्याचा परिणाम भारतील पेट्रोल-डिझेलच्या दरावर होतो. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर वाढल्याने भारतील तेल वितरक कंपन्या पेट्रोल-डिझेलचे दर वाढवू शकतात, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे याची झळ भारतीयांना बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Israel Iran War: “इराणनं आमच्यावर हल्ला करून मोठी चूक केली, आता त्यांना…”, इस्रायलनं दिला थेट इशारा

इराणचा इस्रायलवर हल्ला

मंगळवारी रात्री इराणने इस्रायलमधील अनेक ठिकाणी २०० क्षेपणास्त्रे डागली आहेत. याशिवाय इस्रायलची राजधानी तेल अवीव जवळील जाफामध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच इस्रायलही इराणला जशास तसं उत्तर देण्याची शक्यता आहे. “जो कुणी आमच्यावर हल्ला करेल, त्याला आम्ही हल्ल्याने उत्तर देऊ. तसेच इराणच्या हल्ल्याला आम्ही परतवून लावले आहे. या अपयशी हल्ल्याला लवकरच प्रत्युत्तर दिले जाईल. हमास आणि हेझबोलाची जी अवस्था केली आहे, तीच इराणची केली जाईल”, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनी दिली आहे.