रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धसंघर्ष अजूनही संपलेला नाही. युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहे. युद्धावर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरु असली तरी कच्च्या तेलाच्यात दरामध्ये मोठा चढउतार पाहायला मिळतोय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचे कार्यालय क्रेमलिनेने युक्रेनसोबतच्या शांतता चर्चेवर शंका व्यक्त केल्यामुळे तेलबाजारात जास्तच अस्थिरता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाचा दर सध्या प्रतिबॅरल १०६ डॉलरच्या जवळ पोहोचला आहे.

गुरुवारी न्यूयॉर्कमध्ये कच्च्या तेलाच्या दरामध्ये चढउतार पाहायला मिळाला. तब्बल ८.४ टक्क्यांनी उसळी घेत कच्च्या तेलाचे भाव १०६ रुपये प्रतिबॅरलवर पोहोचले. क्रेमलिनने रशिया आणि युक्रेन यांच्यात होत असलेल्या चर्चेतून काही साध्य झालं नसल्याचं दिसून येत आहे असं म्हटल्यानंतर ही वाढ झालेली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध तसेच चीनमधील कोरोनास्थिती यामुळे कच्च्या तेलाच्या दरामध्ये तेजी पाहायला मिळत आहे.

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे सध्या कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. मात्र तेलाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करण्यात येत आहेत. कच्च्या तेलाच पुरवठादार देश लिबियाने निर्यातदार देशांनी उर्जा संकट कमी करण्यासाठी कच्च्या तेलाचे उत्पदन वाढवणे गरजेचे आहे, असे मत नोंदवले आहे. तर सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बीन सलनमान यांनी जपानच्या पंतप्रधानांना आमचा देश तेलबाजारामध्ये संतुलन आणि स्थिरता ठेवण्यास उत्सुक आहे, असे सांगितले आहे.

तर दुसरीकडे कच्च्या तेलाचा पुरवठा करणाऱ्या रशियावर सध्या अनेक निर्बंध आहेत. त्यामुळे जगभरातील देश रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करताना खबरदारी घेत आहेत

Story img Loader