नेपाळमध्ये इंधनाची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत असल्याने त्यावर मात करण्यासाठी नेपाळने गुरुवारी इंधन पुरवठय़ासाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय घेतला. बांगलादेश अथवा मलेशियातून हवाईमार्गे इंधन आणण्याचा आणि चीनलगतच्या सीमेजवळ पेट्रोल साठा करण्याचा प्रकल्प उभारण्याचा नेपाळ विचार करीत आहे. नव्या घटनेच्या विरोधात नेपाळमध्ये तीव्र निदर्शने केली जात असून भारतासमवेतची व्यापाराची ठाणी बंद करण्यात आल्याने इंधनाची समस्या भेडसावत असल्याने नेपाळने सदर मार्ग स्वीकारण्याचा विचार सुरू केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या प्रकारानंतर व्यापार मंत्रालयाने इंधन आयातीची पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी नेपाळ तेल महामंडळावर सोपविली आहे, असे ‘द काठमांडू पोस्ट’ने म्हटले आहे. त्यानुसार महामंडळाने अल्प आणि दीर्घ मुदतीची इंधन आयात योजना तयार केली आहे. अल्पावधीचा तोडगा म्हणून बांगलादेश अथवा मलेशियातून इंधन आयात करण्याचे नेपाळने ठरविले आहे.सध्या हवाईमार्गे इंधन आणण्याच्या पर्यायावर बुधवारी झालेल्या बैठकीत विचार करण्यात आला. तथापि, याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले. दीर्घ मुदतीचा उपाय म्हणून महामंडळाने चीनमधून इंधन आयात करण्याची शिफारस केली असून ते कितपत व्यवहार्य आहे ते तपासून पाहण्यासाठी तांत्रिक पथक पाठविण्याचे ठरविले आहे.नेपाळ-चीन सीमेलगत पेट्रोलचा साठा प्रकल्प उभारण्याची सूचनाही महामंडळाने नेपाळ सरकारला केली आहे. कोणत्याही निविदा प्रक्रियेविना पेट्रोलजन्य उत्पादने आयात करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महामंडळाने सरकारकडे दिलेल्या प्रस्तावात केली आहे.