OLA Showroom Fire Kalaburagi Karnataka : नवी कोरी इलेक्ट्रिक स्कूटर बिघडली व त्यानंतर ती दुरुस्त होत नसल्यामुळे एका संतापलेल्या ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या मालकाने कर्नाटकमधील कंपनीच्या शोरूमला आग लावल्याची घटना समोर आली आहे. मोहम्मद नदीम (२६) असं शोरूम पेटवणाऱ्या इसमाचं नाव आहे. त्याने २८ ऑगस्ट रोजी नवीन ओला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली होती. मात्र स्कूटर घेऊन घरी गेल्यावर काही दिवसांत ती बिघडली. स्कूटर दुरुस्त करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले, मात्र स्कूटर दुरुस्त झाली नाही.

इकोनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार मोहम्मद नदीम नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करून घरी गेला व तीन दिवसांनी स्कूटर बिघडली. तो रोज स्कूटर घेऊन ओला इलेक्ट्रिकच्या शोरूममध्ये जायचा. मात्र शोरूममधील कर्मचारी त्याची बिघडलेली स्कूटर दुरुस्त करून देऊ शकले नाहीत. त्यामुळे तो कंपनीवर व शोरूममधील कर्मचाऱ्यांवर संतापला होता.

Cylinder explosion on a handcart in front of Shivajinagar court pune news
शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाडीवर सिलिंडरचा स्फोट; तीनजण किरकोळ भाजून जखमी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Police arrest one for black marketing commercial gas Pune news
व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; पोलिसांकडून सिलिंडरच्या ७२ टाक्या जप्त, एकाला अटक
tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
fire broke out at scrap warehouse at Kudalwadi in Chikhli on Monday morning
पिंपरी : चिखलीतील गोदामांच्या आग प्रकरणी जागा मालकाचा शोध
massive fire breaks out at footwear shops in virar
विरारमध्ये चप्पल दुकानांना भीषण आग; आगीत तीन दुकाने जळून खाक
Pimpri , Chikhli, scrap dealers in Chikhli,
पिंपरी : चिखलीतील अनधिकृत भंगार व्यावसायिकांवर कठोर कारवाई करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?

हे ही वाचा >> Rahul Gandhi Meet Ilhan Omar : भारताविरोधी भूमिका मांडणाऱ्या इल्हान ओमरची राहुल गांधींनी घेतली भेट, भाजपा आक्रमक!

कलबुर्गी येथील ओला इलेक्ट्रिकचं शोरूम पेटवलं

मोहम्मद नदीमने १.४ लाख रुपये खर्च करून ही स्कूटर खरेदी केली होती. स्कूटर घरी नेल्यानंतर काहीच दिवसांत बॅटरी व साउंड सिस्टिममध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर नदीमने अनेकदा शोरूममध्ये जाऊन तक्रार केली. मात्र शोरूममधील कर्मचारी त्याची स्कूटर दुरुस्त करू शकले नाहीत. नदीम हा स्वतःदेखील मेकॅनिक आहे. त्याने स्वतः ही स्कूटर दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो देखील त्यामध्ये अपयशी ठरला. त्यामुळे संतापलेल्या नदीमने १० सप्टेंबर रोजी पेट्रोल खरेदी केलं व ते घेऊन तो कलबुर्गी येथील ओला इलेक्ट्रिकच्या शोरूमवर गेला. तिथूनच त्याने त्याची स्कूटर खरेदी केली होती. शोरूम बंद असल्यामुळे त्याने शोरूमबाहेर पेट्रोल ओतलं आणि आग लावली. शोरूम बंद असल्यामुळे सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र शोरूममधील सहा स्कूटर जळाल्या. यात ८.५ लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.

हे ही वाचा >> “आमच्या आणखी २० जागा निवडून आल्या असत्या तर…”, खर्गेंचं मोठं वक्तव्य; काश्मीरमधून भाजपावर हल्लाबोल

नदीम पोलिसांच्या ताब्यात

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या घटनेची माहिती देताना सांगितलं की नदीम दोन आठवड्यांपूर्वी शोरूममधून नवी इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन गेला होता. मात्र, त्या स्कूटरमध्ये वारंवार नवनव्या समस्या येत होत्या. त्यानेही अनेकदा शोरूममध्ये जाऊन तक्रार केली. मात्र शोरूममधील कर्मचारी त्याची स्कूटर दुरुस्त करू शकले नाहीत. स्कूटरमधील समस्या व शोरूममधील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणाला कंटाळून त्यांनी मंगळवारी शोरूम पेटवलं. प्रथमदर्शनी असं वाटलं होतं की शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी. मात्र, या घटनेत नदीमचा सहभाग समजल्यावर आम्ही त्याला ताब्यात घेतलं असून सध्या त्याची चौकशी करत आहोत. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader