Old Rajender Nagar incident Delhi IAS coaching centre flooded : दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये शनिवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे दिल्लीतील काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. दिल्लीतल्या जुन्या राजेंद्रनगर भागात पाणी साचलं होतं. या भागात स्पर्धा परिक्षांची तयारी करून घेणारे अनेक शिकवणी वर्ग आहेत. यापैकी एका आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरलं होतं. बाहेर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काही विद्यार्थी या तळघरात थांबले होते. मात्र या भागात पाणी साचल्यामुळे तळघरातही पाणी शिरलं. यामध्ये तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या तळघरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी बचावपथकाला पाचारण करण्यात आलं. दिल्ली अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बल आणि दिल्ली पोलिसांनी काही तासांच्या प्रयत्नांनंतर येथे विद्यार्थ्याना बाहेर काढलं.

या दुर्घटनेत श्रेया, तान्या आणि नेविन या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. श्रेया ही उत्तर प्रदेशमधील आंबेडकर नगरमधील रहिवासी आहे. तर तान्या सोनी ही मूळची तेलंगणाची आहे. नेविन डालविन हा केरळमधील तरुण या दुर्घटनेत मरण पावला. ही घटना कशामुळे झाली? यास जबाबदार कोण? याबाबत पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे.

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
Video viral grandmothers dance performed on Pahun Jevla Kay song which famous for gautami patil lavani
“पाव्हणं जेवला का?” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही”

विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात रोष

याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यानंतर दिल्ली सरकारने न्यायादंडाधिकाऱ्यांकरवी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी मुख्य सचिवांना याप्रकरणी २४ तासांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दुसऱ्या बाजूला राजेंद्र नगर भागात राहून यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. यापैकी काही विद्यार्थ्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बातचीत केली. यावेळी विद्यार्थी म्हणाले, अद्याप कोणीही या घटनेची जबाबदारी स्वीकारलेली नाही. सरकारमधील कोणीतरी येथे यावं आणि या दुर्घटनेत दगावलेल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी घ्यावी असं आम्हाला वाटतं. ते (सरकार आणि प्रशासन) लोक त्यांच्या वातानुकूलित घर अथवा कार्यालयात बसून ट्वीट (एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरील पोस्ट) करून किंवा पत्र लिहून विद्यार्थ्यांचं भविष्य सुधारू किंवा ठरवू शकत नाहीत.

Old Rajender Nagar Delhi IAS coaching centre flooded
आयएएस कोचिंग सेंटरमधील दुर्घटनेनंतर विद्यार्थ्यांचा संताप

हे ही वाचा >> Delhi IAS coaching centre flooded: मुसळधार पावसामुळे दिल्लीतील IAS कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरले; दोन मुलींसह तिघांचा मृत्यू, इतरांचा शोध सुरू

खासदार बांसुरी स्वराज यांची आपवर टीका

दरम्यान, दिल्लीतील भाजपा खासदार बांसुरी स्वराज व दिल्ली मनपाच्या महापौर शेली ऑबेरॉय यांनी शनिवारी रात्री घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्याची पाहणी केली. त्यानंतर खासदार स्वराज यांनी या घटनेसाठी दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सरकारला दोष दिला आहे. तसेच स्थानिक आमदार दुर्गेश पाठक यांच्याकडे स्थानिकांनी नालेसफाई करण्याची विनंती केली होती. मात्र नालेसफाई न झाल्यामुळे नाल्यातील पाणी तळघरात शिरले, असा आरोपही स्थानिक भाजपा नेते करत आहेत.