Old Rajender Nagar incident Delhi IAS coaching centre flooded : दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये शनिवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे दिल्लीतील काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. दिल्लीतल्या जुन्या राजेंद्रनगर भागात पाणी साचलं होतं. या भागात स्पर्धा परिक्षांची तयारी करून घेणारे अनेक शिकवणी वर्ग आहेत. यापैकी एका आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरलं होतं. बाहेर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काही विद्यार्थी या तळघरात थांबले होते. मात्र या भागात पाणी साचल्यामुळे तळघरातही पाणी शिरलं. यामध्ये तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या तळघरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी बचावपथकाला पाचारण करण्यात आलं. दिल्ली अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बल आणि दिल्ली पोलिसांनी काही तासांच्या प्रयत्नांनंतर येथे विद्यार्थ्याना बाहेर काढलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा