Om Birla attends wedding Of pulwama martyr’s daughter : पुलवामा येथील शहीद जवानाच्या मुलीच्या लग्नाला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हजेरी लावली आणि याबरोबरच शहीद जवानाच्या कुटुंबियांना सहा वर्षांपूर्वी दिलेले वचन पूर्ण केलं. बिर्ला शुक्रवारी राजस्थानमधील कोटा येथे झालेल्या या लग्न सोहळ्याला उपस्थित होते. या लग्नाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
कोटा येथील सांगोद लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेल्या बिर्ला यांनी सांगोड गावातील लग्नाला उपस्थिती लावली. इतकेच नाही तर वधूच्या आईच्या भावाची म्हणजेचे मामाची जबाबदारी पूर्ण करत भात किंवा मायरा विधी पूर्ण केला.
२०१९ च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात वेळी शहीद झालेले केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (CRPF) जवान हेमराज यांची मुलगी, २५ वर्षीय रीना मीणा यांना लग्नाच्यावेळी भेटवस्तू दिली आणि त्यांनी दिलेले वचन पूर्ण केले.
२०१९ मध्ये बिर्ला यांनी हेमराज शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि यावेळी त्यांनी त्या कुटुंबाला ते कधीही एकटे राहणार नाहीत, असं आश्वासन दिले होते. त्यांनी मधुबाला (हेमराज मीणा यांच्या पत्नी) यांना भावाप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे वचन दिले होते. दरम्यान या लग्न सोहळ्यात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याबरोबर राजस्थानचे ऊर्जामंत्री हिरालाल नागर हे देखील सहभागी झाले होते.
हिंदू विवाह परंपरेत भात किंवा मायरा हा एक असा विधी आहे जेथे भाऊ आपल्या बहिणीच्या मुलांच्या लग्नात भेटवस्तू देतात. बिर्ला आणि नागर यांनी मधुबाला यांना पारंपारिक ओढनी आणि इतर भेटवस्तू दिल्या, तर त्यांनी या दोघांची आरती केली.
संसदीय क्षेत्र के सांगोद (कोटा) में शहीद हेमराज मीणा जी व बहन वीरांगना मधुबाला जी की सुपुत्री रीना के विवाह के शुभ अवसर पर मायरा भरने का सौभाग्य प्राप्त हुआ। मन गर्व और आनंद से अभिभूत है कि हमारी बिटिया रीना अब अपने नए जीवन की शुरुआत करने जा रही है। यह अवसर न केवल परिवार के लिए… pic.twitter.com/PM8gihNb8b
— Om Birla (@ombirlakota) April 11, 2025
सभापती ओम बिर्ला यांनी यावेळी हेमराज मीणा यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. “त्यांचे धाडस आणि राष्ट्रावरील प्रेम आपल्या सर्वांना प्रेरणा देत आहे. त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी नेहमीच उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे,” असेबी बिर्ला यावेळी म्हणाले.
पुलवामा हल्ल्यात ४० जवानांचा मृत्यू
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर सैनिकांना घेऊन जाणाऱ्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात ४० जवानांचा मृत्यू झाला होता आणि ३५ हून अधिक जखमी झाले होतो. पुलवामा हल्ला हा भारताच्या इतिहासातील सर्वात भयानक दहशतवादी हल्ल्यांपैकी एक मानला जातो.