जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पाकिस्तान मुस्लिम लीगचे अध्यक्ष नवाझ शरीफ यांचे अभिनंदन करतानाच आता पाकिस्तान आणि भारत या दोन देशांमधील शांतता चर्चेस गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच काश्मीरसह मतभेदाचे मुद्दे सोडविण्यासाठी मैत्रीचा हात पुढे करावा, अशी विनंतीही ओमर यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना केली. नवाझ शरीफ यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्यामुळे आपण खूश असल्याचे ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले. नवाझ शरीफ हे भारतासह शांतता चर्चा पुढे नेतील आणि भारताशी मैत्रीपूर्ण संबंधांना चालना देतील, असा विश्वास अब्दुल्ला यांनी व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Omar abdullah greets pakistans nawaz sharif hopes a restart in peace process