नवाझ शरीफ यांचा पक्ष पाकिस्तानमध्ये पुन्हा सत्तेत येणे ही घटना जम्मू आणि काश्मीरसाठी चांगली असल्याचे मत काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. परदेशी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. पाकिस्तानमध्ये नुकतीच झालेली निवडणूक ही आजवरच्या निवडणुकींपेक्षा वेगळी होती. या निवडणुकीत त्यांच्यापैकी कोणत्याही पक्षाने काश्मीरच्या मुद्दय़ाचा आपल्या प्रचारात समावेश केलेला नव्हता. काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी हा शुभशकुन असून शरीफ यांनी पुन्हा सत्ता हस्तगत करणे ही गोष्टही आमच्यासाठी चांगली आहे, असे ते म्हणाले. भारत आणि पाकिस्तानचे संबंध बिघडतात तेव्हा काश्मीरला मोठा फटका बसतो, त्यामुळे शरीफ यांच्या कार्यकाळात उभय देशांतील संबंध सुधारतील, त्यांच्यातील संवादप्रक्रिया नव्याने सुरू होईल आणि काश्मीरमध्ये शांतता नांदेल, अशी आशा त्यांनी व्यक्त  केली.

Story img Loader