ओरलँडो येथे समलिंगींच्या नाइटक्लबवर हल्ला करणारा ओमर मटीन हा अफगाणी वंशाचा असून ९११ या दूरध्वनी क्रमांकावर त्याने हल्ल्याच्या वेळी आपण आयसिसशी एकनिष्ठ असल्याचे म्हटले होते, दरम्यान, आयसिसनेही ओरलँडोतील हल्लेखोर हा खिलाफतचा सैनिक असल्याचा दावा केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मटीन हा २९ वर्षांचा सुरक्षा रक्षक अफगाणी मातापित्यांचा मुलगा होता व त्याने हल्ल्यापूर्वी आयसिसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी याच्याशी एकनिष्ठ असल्याचे दूरध्वनीवर म्हटले होते. बोस्टनमध्ये २०१३ मध्ये मॅरॅथॉनच्या वेळी हल्ले करणारे सारानाएव बंधू यांचाही उल्लेख त्याने केला होता. मटीन याच्याकडे रायफल व पिस्तूल होते. तो रविवारी पहाटे ओरलँडो येथे समलिंगी क्लबमध्ये घुसला व ५० जणांना ठार केले तसेच या हल्ल्यात ५३ जण जखमी झाले. नंतर पोलिसांनी या हल्लेखोराला गोळ्या घालून ठार केले. त्याने फ्लोरिडातील ओरलँडो येथे असलेल्या समलिंगी क्लबच्या बाथरूममधून फोन ९११ क्रमांकावर फोन केला व त्याने पूर्ण नाव अधिकाऱ्यांना सांगितले होते. अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले असून एफबीआय ही गुप्तचर संस्था आता तपास करीत आहे. ओरलँडोचे पोलिस प्रमुख जॉन मिना यांनी सांगितले, की तो पूर्ण तयारीनिशीच आला होता. त्याचा कुणी साथीदार नव्हता. मटीन हा यापूर्वी एफबीआयच्या निगराणीखाली होता २०१३ व २०१४ मध्ये त्याचे जाबजबाब घेण्यात आले होते पण त्याच्याविरोधात काही न सापडल्याने एफबीआयने त्याला सोडून दिले. त्या चौकशीत काहीच सापडले नाही त्यामुळे त्याला सोडून दिले होते, असे एफबीआयचे विशेष सहायक प्रतिनिधी रोनाल्ड हॉपर यांनी सांगितले. २००७ मध्ये मटीन हा जी ४ एस सिक्युरिटी सोल्युशन्स या कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होता. मटीन याने कायदेशीर पद्धतीने ग्लॉक पिस्तूल व मोठी बंदूक खरेदी केली होती. या हल्ल्यामागचा हेतू अजून समजलेला नाही. ९/११ हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे, असे काही तज्ज्ञांनी सांगितले.
समलिंगी प्रेम आवडत नव्हते..
ओमर मटीन हा मुस्लीम अमेरिकन पण अफगाणी वंशाचा होता. अमेरिकी माध्यमांनी त्याच्या नातेवाइकांच्या मुलाखती घेतल्या. त्यात तो फार धार्मिक होता, असे कुणी सांगितले नाही पण तो त्याच्या पत्नीवर नेहमी हल्ले करीत असे. त्याचे वडील मीर सिद्दीक यांनी सांगितले, की मियामी येथे त्याने रस्त्यावर दोन समलिंगी व्यक्तींना प्रेम करताना पाहिले, तेव्हा त्याचा संताप झाला होता. त्याच्या पत्नीसमोर दोन पुरुषांनी एकमेकांचे चुंबन घेतले, तेव्हा तो अधिकच संतापला होता. या घटनेने देशाइतकाच आम्हालाही धक्का बसला आहे. त्याच्या आधीच्या पत्नीने सांगितले, की कपडे धुऊन इस्त्री करण्याच्या कामाच्या कारणावरून तो मला मारत असे. २००९ मध्ये तिचा मटीनशी विवाह झाला पण तिच्या आईवडिलांनी तिला त्याच्या तावडीतून सोडवले होते.
हिलरींचा प्रचार स्थगित
वॉशिंग्टन- ओरलँडो येथील हल्ल्याच्या घटनेत ५० जण ठार झाल्याच्या पाश्र्वभूमीवर डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षीय शर्यतीतील उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या समवेतची संयुक्त प्रचार मोहीम तूर्त लांबणीवर टाकली आहे. ओबामा यांनी हिलरी क्लिंटन यांच्या उमेदवारीला अलिकडेच पाठिंबा दिला होता. क्लिंटन यांनी ओबामा यांच्या समवेत बुधवारी विस्कॉन्सिन येथे प्रचार करण्याचे ठरवले होते. पण ओरलँडो येथे झालेल्या हल्ल्यात ५० जण मरण पावल्याच्या घटनेनंतर त्यांनी हा प्रचार कार्यक्रम स्थगित केला आहे. व्हाइट हाउसनेही तूर्त ओबामा हे क्लिंटन यांच्या प्रचारासाठी जाणार नाहीत असे सांगितले. बुधवारी विस्कॉन्सिन येथील ग्रीन बे येथे ते हिलरी क्लिंटन यांच्याबरोबर प्रचाराला जाणार होते. ओबामा यांनी ओरलँडो येथील समलिंगी नाइट क्लबमध्ये हल्ल्यात पन्नास लोक ठार झाल्यानंतर देशाला उद्देशून दूरचित्रवाणीवर भाषण केले होते. या हल्ल्यातील संशयित असलेल्या ओमर मटीन या २९ वर्षीय युवकाची एफबीआयने पूर्वी इस्लामी मूलतत्त्ववाद्यांशी संबंधाबाबत चौकशी केली होती पण त्याला टेहळणीखाली ठेवले नव्हते. मटीन याच्याकडे बंदुकीचा परवाना होता व त्यानेच ओरलँडोतील नाइट क्लबमध्ये हल्ला केला. त्यात ५० जण ठार झाले होते.
अमेरिकेतील मुस्लीम नेत्यांकडून निषेध
वॉशिंग्टन- ओरलॅण्डो येथील क्लबवर करण्यात आलेल्या गोळीबाराचा अमेरिकेतील मुस्लीम नेत्यांनी निषेध केला आहे. अमेरिका-इस्लाम संबंध परिषदेचे कार्यकारी संचालक निहाद अवाद यांनी ऐक्याचे आवाहन केले आहे. ओरलॅण्डोतील घटना निंदनीय आहे, जेवढय़ा कडक शब्दांत त्याची निंदा करणे आवश्यक आहे तेवढी आम्ही करतो, त्यामुळे अमेरिकेतील नागरिक म्हणून आणि मुस्लीम नागरिक म्हणून आमच्या तत्त्वांचे उल्लंघन झाले आहे, आम्हाला कोणत्याही स्वरूपाचा दहशतवाद मान्य नाही, असे अवाद म्हणाले. तुम्ही आमच्या वतीने बोलत नाहीत, तुम्ही आमचे प्रतिनिधित्व करीत नाही, तुम्ही बेकायदेशीर आहात, असे अवाद यांनी आयसिसला खडसावले आहे. या गोळीबारात मरण पावलेल्यांसाठी समाजाच्या वतीने निधी उभारण्यात येणार आहे, या हल्ल्यामुळे आम्हाला तीव्र वेदना झाल्या आहेत, असे अवाद यांनी सांगितले.