देशात करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचं वातावरण आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशातील करोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट नोंदवण्यात येत आहे. ही घट केवळ नवीन आढळणाऱ्या रुग्णांचीच नाही तर सक्रिय रुग्णसंख्येतही झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत ,९८७  रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, ७ हजार ९१ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, १६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

देशात आतापर्यंत ३ कोटी ४२ लाख ३० हजार ३५४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. देशात सध्या ७६ हजार ७६६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत ४ लाख ७९ हजार ६८२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण १४१.३७ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.

ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात..

दरम्यान, देशात ओमायक्रॉनचे रुग्णही वाढू लागले आहेत. देशातील १७ राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सर्वात जास्त १०८ रुग्ण आहेत. त्यापैकी ४२ रुग्ण आतापर्यंत करोनातून बरे झाले आहेत. त्यापाठोपाठ दिल्लीत ७९ असून त्यापैकी २३ जण बरे झाले आहेत. गुजरातमध्ये ४३ रुग्ण असून त्यापैकी १० जण बरे झाले आहेत. तेलंगाणामध्ये ४१, तामिळनाडूमध्ये ३८, केरळमध्ये ३४, कर्नाटकमध्ये ३१ रुग्ण आढळले आहेत.