इंग्रजी भाषेला दरवर्षी नवनव्या शब्दरत्नांची भेट देणाऱ्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने यंदा वर्षांतील ब्रिटनच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिती अचूक टिपणाऱ्या ‘ओम्नीशॅम्बल्स’(अजागळ व्यवस्थापन) या शब्दाला ‘वर्ड ऑफ द इयर’ किताबाने गौरविले आहे. ब्रिटनमधील माध्यमांची अस्तंगत अवस्थेला चाललेली अवस्था आणि सरकारच्या धोरणांमधील प्रमादांचा या शब्दाला संदर्भ लावण्यात आलेला आहे.
‘ओम्नीश्ॉम्बल्स’ या शब्दाची व्याख्या करताना ऑक्सफर्डने प्रचंड मोठय़ा चुका, गोंधळ यांच्यामुळे तयार झालेली र्सवकष अजागळ अवस्था अशी केली आहे. २०१२ सालामध्ये वापरण्यात आलेली सर्वात उत्तम संकल्पना म्हणून तिचा गौरव संस्थेने केला आहे. इंग्रजी भाषा जगातील बदलांमुळे तयार झालेल्या शब्दांचे स्वागत करीत असते. याबाबतचा निकष हा केवळ वर्षभरात सर्वाधिक परिणामकारक ठरणाऱ्या गोष्टींनुसार ठरत असतो. यात एक शब्द ब्रिटनचा असतो, तर दुसरा शब्द हा अमेरिकेचा असतो. ग्राफिक्स इंटरचेंज फॉरमॅट म्हणजेच ‘गिफ’ या शब्दाला यंदा अमेरिकेतील शब्दांमधील सम्राट म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. इंटरनेटवरील छायाचित्रांचे सर्वसामान्य स्वरूप म्हणून ‘गिफ इमेज’ ओळखली जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा