भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त गुजरात भाजप शाखेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यात अल्पसंख्याक समाजातील लोकांना भाजपचे प्राथमिक सदस्य बनवण्यात येणार आहे.
नऊ दिवस चालणाऱ्या या अभियानामध्ये अल्पसंख्याक व युवा विभागाला प्रत्येकी एक लाख सदस्य करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
मोदी यांनी आपल्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त आईचे आशीर्वाद घेतले. देशभरातील जनतेने आपल्याला ज्या शुभेच्छा दिल्या आहेत त्या व्यर्थ जाणार नाहीत, असा विश्वास मोदींनी यानिमित्ताने व्यक्त केला.
वाढदिवसानिमित्त सकाळी मोदी आपले धाकटे भाऊ पंकज यांच्या गांधीनगर येथील घरी गेले. तिथे त्यांनी आई हिराबा यांचा आशीर्वाद घेतला. त्या वेळी त्यांनी मोदींना पुस्तक आणि काही पैसे दिले. आईपेक्षा दुसरा मोठा आशीर्वाद कुठला, अशी प्रतिक्रिया मोदींनी व्यक्त केली. पंतप्रधान मनमोहन सिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, लता मंगेशकर यांनीही मोदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याचे मोदींच्या कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.
मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे अल्पसंख्याक जोडो अभियान
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त गुजरात भाजप शाखेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
First published on: 18-09-2013 at 12:10 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On modis 64th birthday gujarat bjp to launch membership drive today