गेल्या दोन आठवड्यांहून अधिक काळ दिल्लीच्या जंतर मंतरवर भारताच्या कुस्तीपटूंनी आंदोलन पुकारले आहे. भारतीय कुस्तीपटू महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभुषण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता. आता याप्रकरणी ब्रिजभुषण सिंह यांनी दिल्ली पोलिसांसमोर हजर राहत जबाब नोंदवला आहे. तसंच ब्रिजभुषण सिंह यांनी त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. याप्रकरणी एएनआ या वृत्तसंस्थेने माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुस्तीगिरांनी तक्रार केल्यानंतर ब्रिजभुषण सिंह यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. तसंच, त्यांच्याकडून काही कागदपत्रेही मागवण्यात आली आहेत. दरम्यान, याप्रकरणी पुढील चौकशीकरता एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये चार महिला अधिकारी आणि सहा पोलीस अधिकारी असणार आहेत. पोलीस उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन झाली आहे.

Eknath Shinde On Heena Gavit :
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा हिना गावितांना अप्रत्यक्ष इशारा; म्हणाले, “बंडखोरी…”
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
aishwarya rai and abhishek bachchan
“सेटवर आम्ही कधीच त्यांना…”, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनबाबत अभिनेता म्हणाला, “त्यांच्या नात्यामुळे…”
Raosaheb Danve Viral Video:
Raosaheb Danve : कार्यकर्त्याला लाथ मारल्याच्या व्हिडीओवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो, तेव्हा…”
raj thackeray criticized sharad pawar
“शरद पवारांचं आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं”, राज ठाकरेंची सडकून टीका; रिफायनरीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनाही केलं लक्ष्य, म्हणाले…
case has been registered against city president of Sharad Pawar NCP in case of assault
राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या शहराध्यक्षावर मारहाण प्रकरणी गुन्हा

महासंघाच्या सचिवांचाही नोंदवला जबाब

महासंघाचे सचिव विनोद तोमर यांचाही जबाब यावेळी नोंवण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या एफआयरमध्ये विनोद तोमरसुद्धा आरोपी आहे. ब्रिजभुषण सिंह यांना काही व्हिडीओ आणि मोबाईल डेटा सादर करण्यास सांगितला आहे. याप्रकरणाची चौकशी करण्याकरता दिल्ली पोलीस उत्तर प्रदेश, झारखंड, कर्नाटक आणि हरयाणा येथे गेले होते. तेथून त्यांनी काही पुरावे गोळा केले आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला देशभरातून चांगला पाठिंबा मिळत आहे. देशभारतील नागरिकांकडून पाठिंबा मिळण्याकरता काल (११ मे) त्यांनी सोशल मीडियावर एक हॅशटॅगही ट्रेन्ड केला होता. या हॅशटॅगला अनेकांनी प्रतिसाद दिला आहे. तसंच, ब्रिजभुषण सिंह यांना अटक होत नाही तोवर आम्ही येथून हलणार नसल्याचीही भूमिका या खेळाडूंनी घेतली आहे.