‘रायसिन’ हे अत्यंत जहाल विष लावलेले पत्र अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना पुन्हा एकदा पाठविण्यात आले होते. मात्र, एफबीआयने सतर्क राहात ते वेळीच ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणी टेक्सास येथील एकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
यापूर्वीही असे विषारी पत्र न्यूयॉर्कच्या महापौर ब्लूमबर्ग यांना तसेच खुद्द अध्यक्ष ओबामा यांनाही पाठविण्यात आले होते. अमेरिकेच्या अध्यक्षांना व्हाइट हाऊसच्या पत्त्यावर जहाल विष लावलेले पत्र पाठविण्यात आले आहे, या वृत्तास अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रवक्ते एटविन डोनोव्हन यांनी दुजोरा दिला. एफबीआयच्या दहशतवादविरोधी पथकाकडे अधिक तपासासाठी सदर पत्र पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही डोनोव्हन यांनी दिली.
या पत्रामध्ये आणि न्यूयॉर्कच्या महापौरांना पाठविलेल्या पत्रामध्ये बरेच साम्य असल्याचे पोलीस सूत्रांनी म्हटले आहे. या पत्रामध्ये असलेली गोष्ट (रायसिन विष) हे तुझ्यासाठी मी आखलेल्या ‘योजने’च्या तुलनेत काहीच नाही, असा इशारा महापौरांना पाठविलेल्या पत्रात देण्यात आला होता. त्याच आशयाची धमकी या पत्रातूनही देण्यात आली आहे.
या प्रकरणी, तपास अधिकाऱ्यांनी टेक्सास येथील एका नागरिकास ताब्यात घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा