पीटीआय, मलप्पुरम, तिरुवअनंतपुरम

केरळमध्ये पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष निर्माण झाला आहे. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना हटवण्यासाठी केंद्र सरकारशी संपर्क साधण्याचा विचार करत असल्याची माहिती मुख्यमंत्री विजयन यांनी दिली. तर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा ‘गुंड’ असा उल्लेख केला.

Aditi Tatkare OnLadki Bahin Yojana January Installment Date in Marathi
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Varsha Gaikwad On Saif Ali Khan
Varsha Gaikwad : ‘मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे, राज्यात जे घडतंय ते…’, सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर वर्षा गायकवाड संतापल्या
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
mumbai High Court encroachment Sanjay Gandhi Udyan
संजय गांधी उद्यान अतिक्रमणमुक्तच हवे, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला खडेबोल
Chhagan Bhujbal On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : “…अन्यथा दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल”, लाडकी बहीण योजनेबाबत छगन भुजबळांचं मोठं विधान
Mumbai governor loksatta news
राज्यपाल नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीचे प्रकरण: निर्णय न घेण्याची राज्यपालांची भूमिका खेदजनक, उच्च न्यायालयाची टिप्पणी
aaditya Thackeray
राज्य सरकारकडची थकीत रक्कम मिळवण्यासाठी प्रयत्न करा, आमदार आदित्य ठाकरे यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

केरळमधील डाव्या आघाडीचे सरकार आणि राज्यपाल मोहम्मद आरिफ खान यांच्यामध्ये अनेक मुद्दय़ांवरून वाद सुरू आहे. केरळ सरकार केंद्र सरकारकडे राज्यपाल खान यांना माघारी बोलवण्याची विनंती करण्याची शक्यता आहे. अशी मागणी करण्यासाठी केंद्र सरकारशी संपर्क साधण्याचा विचार करत असल्याची माहिती मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सोमवारी दिली. राज्यपालांनी काही शिष्टाचारांचे पालन करायचे असते याचा त्यांना विसर पडला असून ते आता वैयक्तिक हल्ले करू लागले आहेत असे विजयन म्हणाले.राज्यपाल खान हे जाणीवपूर्वक प्रक्षोभक विधाने करून राज्यातील शांततापूर्ण वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप विजयन यांनी माध्यमांशी बोलताना केला.

हेही वाचा >>>Gyanvapi Mosque : ज्ञानवापी प्रकरणात पुरातत्व खात्याने सादर केला अहवाल, पुढील सुनावणी २१ तारखेला

दुसरीकडे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि सत्ताधारी माकपची विद्यार्थी संघटना असलेली स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) हे ‘गुंडगिरी’ करत असल्याचा आरोप राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी सोमवारी केला. आपण त्यांना भीत नसल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या आरोपाबद्दल पत्रकारांनी विचारले असताना राज्यपालांनी त्यांचा उल्लेख ‘गुंड’ असा केला. राज्यपालांनी ‘एसएफआय’वरही दांडगाईचा आरोप केला. ‘‘त्यांना मला इजा करायची असेल तर खुशाल करा. त्यासाठी माझ्यासमोर या’’ असे आवाहनही त्यांनी दिले. 

‘एसएफआय’ची राज्यपालांविरोधात फलकबाजी

‘एसएफआय’ने राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याविरोधात फलक लावले आहेत. त्यामुळे हा वाद आणखी भडकल्याचे दिसत आहे. विद्यापीठांचे कुलपती म्हणून राज्यपालांनी विद्यापीठांबरोबर काम करावे, संघ परिवाराबरोबर नाही असा संदेश लिहिलेला एक फलक तिरुवअनंतपुरममधील सरकारी संस्कृत महाविद्यालयात लावण्यात आला आहे.

केंद्र आणि राज्यामधील संबंध सलोख्याचे ठेवण्यासाठी राज्यपालांच्या कारवाया दुरुस्त करण्याची गरज आहे. ते राज्यातील शांतता आणि सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे राज्य सरकारला वाटते. असे दिसते की आम्हाला त्यांना हटवण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करावी लागेल.- पिनराई विजयन, मुख्यमंत्री, केरळ

तुम्हाला त्यांचा (विजयन यांचा) इतिहास माहित आहे का? ते किती हत्यांच्या प्रकरणांमध्ये सहभागी आहेत? एक गुंड दुसरे काय बोलणार? मी कोणते प्रक्षोभक विधान केले? मी माकपच्या लोकांनी सिनेटमध्ये नामनिर्देशित केले तर चालेल का?- आरिफ मोहम्मद खान, राज्यपाल, केरळ

Story img Loader