बिहारची राजधानी पटना येथील एका छोट्या गावात राहणा-या मधुमिता शर्मा हिला गुगलने एक कोटी रुपयांचं पॅकेज दिलं आहे. बिहारच्या खगौल येथे राहणा-या मधुमिताची जगातील तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी गुगलने मुलाखतीच्या ७ फे-यांनंतर निवड केली. सोमवारी मधुमिता गुगलच्या स्विझर्लंड येथील मुख्य कार्यालयात कामावर रुजू होणार असल्याची माहिती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मधुमिताची गुगलच्या स्विझर्लंड येथील मुख्य कार्यालयात टेक्निकल सोल्यूशन इंजिनिअर या पदासाठी  निवड झाली आहे. मधुमिता लहानपणापासूनच एखाद्या मोठ्या कंपनीत करण्याचं स्वप्न पाहायची, आज अखेर तिला मेहनतीचं फळ मिळालं, तिला मिळालेलं यश पाहून सर्वच आनंदी आहेत असं मधुमिताची आई चिंता शर्मा म्हणाल्या. परदेशामध्ये अडीच महिन्याच्या कालावधीत मधुमिता गुगल इंटरव्ह्यूच्या सात फे-या पास झाली. इंटरव्ह्यू पास होणारी मधुमिता भारतातील एकमेव उमेदवार होती, आणि तिची गुगलने निवड केली.

मधुमिताची एक बहिण डॉक्टर , तर भाऊ इंजिनिअर आहे. तिचे वडिल सुरेंद्र शर्मा रेल्वेमध्ये सहायक आरपीएफ कमांडंट आहेत, तर आई गृहिणी आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One crore package from google to bihar girl madhumita sharma