श्रीनगर शहरातील बाटामालू भागामध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांच्या गाडीवर केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात हिज्बुल मुजाहिदीनच्या कैद्याचा मृत्यू झाला. या घटनेत पाच जण जखमी झाले असून, त्यामध्ये चार पोलिसांचा समावेश आहे.
बुधवारी दुपारी १२च्या सुमारास बाटामालूच्या बसस्थानकाजवळून पोलिसांची गाडी हिज्बुलच्या कैद्याला घेऊन निघालेली असताना दहशतवाद्यांनी त्याच्यावर ग्रेनेड हल्ला केला. दहशतवाद्यांनी फेकलेले काही ग्रेनेड गाडीच्या आतमध्ये पडून फुटल्यामुळे पोलिस कर्मचारी जखमी झाले. शकील अहमद खताना असे मृत्युमुखी पडलेल्या कैद्याचे नाव आहे. हा हल्ला झाला त्यावेळी तेथून निघालेला एक नागरिकही या घटनेत जखमी झाला. गुलाम नबी असे या नागरिकाचे नाव आहे. पोलिस खताना याला पंतचौक पोलिस ठाण्यातून बारामुल्ला कारागृहात घेऊन निघाले होते.

Story img Loader