रसगुल्ले खाण्यावरून झालेल्या भांडणातून एकाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील आग्रा येथे उघडकीस आला आहे. तसेच या भांडणात दोघे जण जखमी झाल्याचीही माहिती आहे. बुधवारी रात्री झालेल्या एका लग्नसमारंभात हा प्रकार घडला.

हेही वाचा – एलॉन मस्क यांनी घेतला ट्विटरचा ताबा, मालकी हक्क मिळताच CEO पराग अग्रवालांची हकालपट्टी

आग्राच्या इमादपुरा परिसरातील विनायक भवन येथे बुधवारी रात्री एका लग्नसमारंभाचे आयोजन करण्यात आले होते. लग्नाचे विधी पार पडल्यानंतर जेवणासाठी गेलेल्या वधू-वराकडील मंडळींमध्ये रल्लगुल्ले खाण्यावरून वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर दोन्ही गटातील काही लोकांनी एकमेकांवर चाकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात एका २० वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर, तिघे जण जखमी झाले.

हेही वाचा – ‘घड्याळ चोर’, इम्रान खान यांच्याविरोधात पाकिस्तानी नागरिकांची घोषणाबाजी, कोर्ट परिसरात धक्काबुक्की

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच या घटनेचा तपास सुरू असून सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शींचे बयान नोंदवण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक अरीब अहमद यांनी सांगितले आहे.