आसामधील उदलगिरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या ग्रेनेड स्फोटात एक जण ठार, तर तीन जण जखमी झाले आहेत.
उदलगुरी जिल्ह्यातील रोवटा मधील बाजार परिसरात ग्रेनेडचा स्फोट झाला. यामध्ये एक व्यक्ती ठार झाली असून तीन नागरिक जबर जखमी झाल्याचे वृत्त आहे. राम चंद्र बर्मन असे स्फोटात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. स्फोटाची घटना कळताच वरिष्ठ अधिका-यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास कार्यास सुरुवात केली.

Story img Loader