मंकीपॉक्सची लक्षणं असलेल्या एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर मंगळवारी (२ ऑगस्ट) केरळमध्ये आणखी एका व्यक्तीला मंकीपॉक्सचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आता केरळमधील एकूण मंकीपॉक्सबाधित रुग्णांची संख्या पाचवर गेली आहे. यासह देशात मंकीपॉक्स संसर्ग झालेल्यांची संख्या सातवर गेली आहे. केरळमध्ये आढळलेला रुग्ण नुकताच संयुक्त अरब अमिरातहून (UAE) आला होता.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी नव्या मंकीपॉक्स संसर्गाला दुजोरा दिला आहे. नव्याने संसर्ग झालेल्या ३० वर्षीय रुग्णावर मलपपूरम येथे उपचार सुरू आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली. हा रुग्ण २७ जुलैला संयुक्त अरब अमिरात येथून आला होता.

CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Viral Video Shows lion gripping a mans limbs
‘हे तुमच्या कर्माचे फळ…’ पिंजऱ्यातील पाळीव सिंहाने माणसावर केला हल्ला अन्… VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
yugendra pawar slams ajit pawar ncp for not opposing gopichand paradkar over his remarks on sharad pawar
पडळकरांच्या टीकेला विरोध करायला हवा होता;  युतीतील राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवारांची अपेक्षा
Banana health benefits
दररोज एक केळे खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहू शकता? तज्ज्ञ काय सांगतात…
hundred liver transplants at New Era Hospital in nagpur
अवयव दानाला बळ… मध्य भारतातील एकाच रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणाचे शतक
Kurla Best bus accident, Sanjay More ,
Kurla Bus Accident : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरेला अटक
bjp leader and mlc yogesh tilekar uncle satish wagh killed after kidnapped in pune
भाजपचे नेते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा अपहरण करून खून

दरम्यान, केरळमध्ये सोमवारी (१ ऑगस्ट) मंकीपॉक्स सदृश लक्षणं असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर २० जणांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. नव्याने संसर्ग झालेला रुग्ण कुटंबीय व मित्र अशा एकूण १० जणांच्या संपर्कात आलेला आहे, अशीही माहिती प्रशासनाने दिली.

मंकीपॉक्सचा प्रसार आत्तापर्यंत कसा झाला आहे?

माणसामध्ये मंकीपॉक्स हा आजार प्रथम १९७० मध्ये डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगो येथे नऊ वर्षांच्या बालकांमध्ये आढळला. या भागामध्ये देवी रोगाचे निर्मूलन १९६८ साली झाले होते. त्यानंतर काँगो खोऱ्यातील वर्षांवनांचा विभाग आणि ग्रामीण भागांमध्ये अनेक रुग्ण आढळले. बेनिन, कॅमेरून, द सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगो, लिबेरिया, नायजेरिया, दक्षिण सुदान अशा आफ्रिकेतील ११ देशांमध्ये १९७० पासून या आजाराचे रुग्ण आढळत आहेत. आफ्रिकेव्यतिरिक्त बाहेरील देशात, अमेरिकेत २००३ मध्ये प्रथम या आजाराचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर २०१८, २०१९ आणि २०२१ मध्ये विविध देशांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव होत आहे. जानेवारी २०२२ पासून ज्या देशांमध्ये यापूर्वी मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव झालेला नाही, अशा देशांमध्येही मंकीपॉक्सचा उद्रेक होत आहे. युरोप आणि अमेरिकेत सध्या जास्तीत जास्त रुग्ण आढळत आहेत. 

करोनाच्या तुलनेत मंकीपॉक्स हा आजार किती गंभीर आहे?

करोनाच्या तुलनेत हा आजार फारसा गंभीर नसून आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांमध्ये याचे स्वरूप सौम्य ते मध्यम आहे. जगभरात आढळलेल्या १४ हजार ५३३ रुग्णांपैकी दोन रुग्णांनाच अतिदक्षता विभागात दाखल करण्याची आवश्यकता भासली आहे, तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बहुतांश रुग्णांमध्ये या आजाराची लक्षणे काही आठवडय़ांनी आपोआप कमी होतात. काहीच रुग्णांमध्ये त्याचे स्वरूप तीव्र होते. नवजात बालके, रोगप्रतिकारशक्ती कमी असलेली बालके किंवा दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींमध्ये हा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो. या आजारांमध्ये गुंतागुंत झाल्यास न्यूमोनिया, सेप्सिस, मेंदूतील गुंतागुंत, दृष्टिपटलाचा संसर्ग इत्यादी आजार होण्याची शक्यता असते. याचा मृत्युदर ० ते १० टक्के आहे. परंतु याचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने दक्षता घेणे आवश्यक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.

मंकीपॉक्स आरोग्य क्षेत्रासाठी आणीबाणी का घोषित केला गेला?

मंकीपॉक्सचे स्वरूप करोनाच्या तुलनेत सौम्य असले तरी आत्तापर्यंत याचा प्रसार न झालेल्या देशांमध्येही उद्रेक होत आहे. बालके आणि गर्भवती महिलांमध्ये याची बाधा होत असल्याचे आढळले आहे. याचा प्रसार इतर देशांमध्ये कसा होत आहे, याबाबत अजूनही ठोस कारणे स्पष्ट झालेली नाहीत. तसेच या आजाराच्या लक्षणांमध्येही काहीसा फरक होत असल्याचे आढळले आहे. या सर्व कारणांमुळे आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब मानून जागतिक आरोग्य संघटनेने त्यास आणीबाणी घोषित केले आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात जनजागृती होऊन या आजाराचा प्रसार रोखणे शक्य होईल. 

हेही वाचा >>> विश्लेषण : ‘मंकीपॉक्सपासून मारबर्गपर्यंत’… करोनापेक्षाही भयंकर असलेल्या ‘या’ विषाणूंचे जगात थैमान

मंकीपॉक्स आणि करोनामध्ये काय फरक आहे?

मंकीपॉक्स आणि करोना या दोन्हींची लागण दोन वेगवेगळय़ा विषाणूमुळे होते आणि प्रसारही वेगवेगळय़ा पद्धतीने होतो. मंकीपॉक्स हा डीएनए पद्धतीचा विषाणू असून इतर डीएनए विषाणूंच्या तुलनेत हा सर्वात मोठा विषाणू आहे. मंकीपॉक्सच्या विषाणूचे उत्परिवर्तन म्हणजेच म्युटेशन होण्याची प्रक्रिया करोना किंवा इबोला यांसारख्या आरएनए विषाणूच्या तुलनेत फारच कमी आहे. त्यामुळे हा तसा स्थिर विषाणू आहे. आत्तापर्यत मंकीपॉक्सच्या विषाणूमध्ये कोणत्याही प्रकारचे म्युटेशन झाल्याचे पुरावे आढळलेले नाहीत, असे जागतिक आरोग्य संघटनच्या डॉ. रोझमंड लुईस यांनी स्पष्ट केले. मंकीपॉक्स हा प्राण्यांपासून होणारा संसर्गजन्य आजार असला तरी प्राण्यांद्वारे माणसांमध्ये आणि एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीला होतो.

पाहा व्हिडीओ –

बाधित रुग्णाच्या शरीरावर आलेल्या पुरळमधून बाहेर पडणारा द्रव, लैंगिक संपर्क, घाव किंवा जखम याच्याशी संपर्क आल्यास किंवा त्वचेशी संपर्क आल्यास मंकीपॉक्सची लागण होऊ शकते. बाधित व्यक्तीने वापरलेल्या कपडय़ांशी संपर्क आल्यास, तसेच अशा व्यक्तींच्या खूप काळ सोबत असल्यास, तिची शिंक किंवा तोंडातून बाहेर पडणारी थुंकी याद्वारेही बाधा होऊ शकते.

Story img Loader