छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यामध्ये पोलिस आणि नक्षवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक नक्षली कमांडर ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नक्षलवाद्यांच्या या म्होरक्यावर २.१० लाख रुपयांचे बक्षिस घोषित करण्यात आले होते. इंडो-तिबेटन बॉर्डर फोर्स व राज्य पोलिस यांच्या संयुक्त कारवाईत हा नक्षली म्होरक्या ठार झाल्याचे राजनांदगावचे पोलिस अधिक्षक संजीव शुक्ला यांनी सांगितले. तसेच यावेळी इतर नक्षलवादी जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत ठार झालेल्या नक्षली म्होरक्याचे नाव उमधसिंग असून तो तेथील स्थानिक नक्षली कमांडर असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

(संग्रहित छायाचित्र)

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One naxal commander dead in police firing