एका बंद पडलेल्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी सदर कारखान्याच्या आवारातून भंगाराचा ट्रक जाण्यास विरोध केला. या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाला. येथे अशोक पेपर मिल हा कारखाना काही महिन्यांपूर्वीच बंद झाला होता. या कारखान्याच्या आवारातून भंगार घेऊन एक ट्रक जात होता. दरम्यान हा ट्रक पुढे जाऊ देण्यास या कारखान्याच्या माजी कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबीयांसह रस्त्यावर येऊन विरोध केला. या विरोधकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सुरुवातीस सौम्य लाठीमार केला. प्रत्युत्तरादाखल जमावाने दगडफेक सुरू केली.
अखेरीस परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. यात एका युवकाचा मृत्यू झाला, तर २ जण जखमी झाले.