पाकिस्तानी सैन्याने बुधवारी रात्री पुन्हा शस्त्रसंधीचा भंग केला. जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात सीमेलगतच्या लष्कराच्या चौकीवर केलेल्या छुप्या (स्नायपर गन) गोळीबारात भारताचा जवान शहीद झाला. शिपाई रचपाल सिंह असे हुतात्मा जवानाचे नाव असून ते २२-शीख युनिटमध्ये होते. ही घटना घडली तेव्हा सिंह हे नियंत्रण रेषेनजीकच्या परविंदर चौकीला पहारा देत होते. हल्ल्यात सिंह हे गंभीर जखमी झाले.
नियंत्रण रेषेनजीक पाकिस्तानी सैन्याने केलेला या महिन्यातील हा तिसरा छुपा हल्ला आहे. अशाच एका घटनेत काश्मीर खोऱ्यात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान हुतात्मा झाले होते. बुधवारी पाकिस्तान सैन्याकडून शस्त्रसंधीभंगाच्या आणखी दोन घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader