जम्मू-काश्मीरमधील कारगिल विभागात शनिवारी झालेल्या हिमस्खलनात लष्कराचा गस्तीवर असलेला एक जवान अडकला तर त्याच्याबरोबरच्या दुसऱ्या जवानाची बर्फातून सुटका करण्यात यश आले आहे. जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमधील ३००० मीटर उंचीवरील प्रदेशात हिमवृष्टी सुरू असल्याने हिमस्खलन होण्याचा इशारा संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने दिला होता. शनिवारी कारगिल प्रदेशात सौम्य भूकंपाचा धक्का बसल्याने हिमस्खलन झाले. त्यात गस्तीवर असलेले दोन जवान अडकले. त्यातील एका जवानाची सुटका करण्यात यश आले आहे.
हिमस्खलनात एक जवान अडकला
जम्मू-काश्मीरमधील कारगिल विभागात शनिवारी झालेल्या हिमस्खलनात लष्कराचा गस्तीवर असलेला एक जवान अडकला
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 20-03-2016 at 00:05 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One soldier stuck in jammu kashmir