राजस्थानमधील रायसिंहनगरमधून कारवाई
सीमेपलीकडून अमली पदार्थ आणि स्फोटकांची तस्करी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानाला अटक करण्यात आल्याचे शनिवारी पोलिसांनी सांगितले.
सदर जवानाचे नाव अनिलकुमार (२९) असे असून त्याची राजस्थानमध्ये नेमणूक करण्यात आली होती. राजस्थानमधील रायसिंहनगर येथून त्याला अटक करण्यात आली, असे मोहालीचे पोलीस अधीक्षक गुरप्रीतसिंग भुल्लर यांनी सांगितले.
पैशांच्या मोबदल्यात पाकिस्तानमधून अमली पदार्थ आणि शस्त्रांचे तस्करी करण्यासाठी अनिलकुमार सहकार्य करीत होता. ही रक्कम त्याने बँकेच्या खात्यात जमा केल्याचेही आढळले आहे, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.
हजारोंचा मोबदला
अनिलकुमार याला प्रथम ५० हजार रुपये आणि त्यानंतर ३९ हजार रुपये मोबदला देण्यात आला होता आणि ही रक्कम त्याने पत्नीच्या बँक खात्यात जमा केली होती, असेही पोलिसांनी सांगितले.
सीमेपलीकडील तस्करीला सहकार्यप्रकरणी जवानाला अटक
अनिलकुमार याला प्रथम ५० हजार रुपये आणि त्यानंतर ३९ हजार रुपये मोबदला देण्यात आला होता
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 10-01-2016 at 00:18 IST
TOPICSभारतीय सैनिक
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One soldiers arrested in smuggling case