सीरियन सैन्याने दमास्कसच्या पूर्वेकडे केलेल्या हवाई हल्ल्यात सीरियन बंडखोरांचा शक्तिशाली प्रमुख झहरान अल्लौश मारला गेल्यामुळे सुमारे पाच वर्षांपासून फोफावणारे बंड आणि ठिसूळ शांतता प्रक्रिया यांना जोरदार धक्का बसला आहे.
४४ वर्षे वयाचा अल्लौश हा दमास्कसच्या पूर्वेकडील बंडखोरांचा बालेकिल्ला असलेल्या घौटा येथील जैश-अल-इस्लाम (इस्लामचे सैन्य) या या प्रबळ विरोधी गटाचा म्होरक्या होता. पूर्व घौटामधील या बंडखोरांच्या बैठकांना लक्ष्य बनवून केलेल्या हवाई हल्ल्यात अल्लौश त्याच्या सहा साथीदारांसह मारला गेला, असे वृत्त ‘सीरियन ऑब्झव्‍‌र्हेटरी फॉर ह्य़ूमन राइट्स’ या स्वयंसेवी संस्थेने दिले आहे.
लष्कराच्या तीन विमानांनी कमांडर्सच्या ‘गुप्त बैठकांना’ लक्ष्य केले, असे सांगून जैश-ए-इस्लामच्या एका वरिष्ठ सदस्याने अल्लौश मरण पावल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. सीरियन सैन्याने एका ‘विशेष मोहिमेत’ अल्लौशला ठार मारल्याचे वृत्त सरकारी दूरचित्रवाणीने दिले आहे.

Story img Loader