भारतीय स्पर्धा आयोगाचा ठपका
महिना-दोन महिन्यांतून कांद्याचे दर गगनाला भिडत असल्याबद्दल उत्पादन घटले, आवक रोडावणे अशी कारणे दिली जात असली तरी प्रत्यक्षात कांदा बाजारातील व्यापाऱ्यांनी नफेखोरीसाठी केलेले संगनमत आणि साठेबाजी यामुळे कांदा महाग होतो, असा थेट ठपका भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) ठेवला आहे. कांद्याच्या भावातील चढउतारांचा देशाच्या अन्नसुरक्षेबरोबरच ग्राहक-शेतकरी हितावरही विपरीत परिणाम होत असल्याचा अहवालही सीसीआयने दिला आहे.
बेंगळुरूमधील ‘इन्स्टिटय़ूट फॉर सोशल अॅण्ड इकॉनॉमिक चेंज’ने सीसीआयच्या वतीने कांद्याच्या बदलत्या किमतींबद्दल अभ्यास केला. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील कांदा बाजारांतील पाहणीनंतर केलेला अहवाल डिसेंबरमध्येच सीसीआयकडे सोपवण्यात आला आहे. ‘हंगामनिहाय किंमत निर्देशांक, सहसंबंध, दैनिक-मासिक आवक यांची तुलना केली असता कांदा बाजारात मोठय़ा प्रमाणात नफेखोरी सुरू असल्याचे दिसते, असे या अहवालात म्हटले आहे. याला व्यापारी व दलालांचे संगनमत प्रामुख्याने कारणीभूत असून शेतकरी व ग्राहक या दोघांनाही त्याचा मोठा फटका बसतो,’ असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा