इंग्रजी भाषा हेच केवळ प्रगतीचे एकमेव माध्यम असल्याचा भ्रम आहे, असे मत रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. दया प्रकाश सरस्वती विद्या मंदिराच्या नव्या इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी इंग्रजीवर टीका केल्यानंतर आता भागवत यांनीही त्यावर तोफ डागली आहे.
देशाबद्दल प्रेम, समर्पित वृत्ती आणि आदराची भावना विकसित होणे हे खरे शिक्षण आहे. पैसे मिळविणे हेच सर्वस्व नाही तर मुलांवर संस्कार घडविणे महत्त्वाचे आहे आणि त्यांना प्रेमाची जाणीव व्हावयास हवी, असेही मोहन भागवत म्हणाले.
सध्याची शिक्षणपद्धती ही देशहिताची नाही, भ्रष्टाचार सुशिक्षित लोकांकडून केला जातो. केवळ ९० ते १०० टक्के गुण मिळाल्याने गुणवत्ता सिद्ध होत नाही तर मुलांनी सर्व क्षेत्रात सहभागी व्हावयास हवे, असेही भागवत म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा