Israel – Palestine News in Marathi : इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन देशांमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. हमास या दहशतवादी संघटनेने गाझा पट्टीवर शेकडो क्षेपणास्त्र डागून हजारो इस्रायल नागरिकांचे प्राण घेतले. तर, त्या प्रत्युत्तरात इस्रायलनेही हल्ले चढवल्याने अनेक पॅलेस्टाईनी नागरिकांचाही जीव गेला आहे. दरम्यान, इस्रायलमध्ये असंख्य भारतीय राहतात. इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याकरता भारत सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ.एस जयशंकर यांनी यासंदर्भत ट्वीट करत माहिती दिली.

हेही वाचा >> मोठी बातमी! दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी इस्रायलमध्ये आपत्कालीन सरकारची स्थापना, विरोधकांचाही पाठिंबा

syria civil war marathi news
सीरियातील अचानक सत्ताबदलाने कुणाला काय मिळणार? रशिया-इराणचे नुकसान कसे? तुर्कीये-इस्रायलचा फायदा कसा?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Prime Minister announces free elections in Syria
Syria : सीरिया बंडखोरांच्या ताब्यात! ७५ भारतीयांचं यशस्वी स्थलांतर; लवकरच मायदेशी परतणार
Sanjay Raut
“…तर मोदींनी बांगलादेशमधील हिंदूंसाठी काहीतरी केलं असतं”, ठाकरेंच्या शिवसेनेची टीका
India Bangladesh relations, Foreign Secretary talks
भारत-बांगलादेश संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न, परराष्ट्र सचिवस्तरीय चर्चेत हिंदूंच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी
Narendra Modi Syria
सीरियावर बंडखोरांचा ताबा; भारताची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “देशाची अखंडता जपण्यासाठी…”
Indian Foreign Secretary Vikram Misri visits Bangladesh
परराष्ट्र सचिव मिस्राी आज ढाक्यात; बांगलादेशला दोन्ही देशांतील तणाव निवळण्याची आशा

“इस्रायलमध्ये अडकलेल्या ज्या भारतीयांना मायदेशी परतण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ‘ऑपरेशन अजय’ सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी विशेष चार्टर विमाने आणि इतर व्यवस्था करण्यात येत आहे. आम्ही परदेशात आमच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत”, असं ट्वीट एस. जयशंकर यांनी केलं आहे.

इस्रायलमध्ये सुमारे १८,००० भारतीय नागरिक आहेत

इस्रायलमध्ये नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्ताने अनेक भारतीय नागरिक गेले आहेत. येथे सुमारे हजारो विद्यार्थी असून, आयटी व्यावसायिक, हिरे व्यापारीही आहेत. अमर उजालाने दिलेल्या माहितीनुसार, येथे जवळपास १८ हजार भारतीय नागरिक आहेत.

इस्रायलमध्ये आपत्कालीन सरकारची स्थापना

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि विरोधी पक्षनेते बेनी गॅंट्झ यांनी हमासच्या दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी आपत्कालीन एकता सरकार स्थापन केले आहे. तसंच युद्ध मंत्रिमंडळ स्थापन करण्यासही सहमती दर्शविली आहे. त्यात नेतन्याहू, गॅंट्झ, विद्यमान संरक्षण मंत्री योव गॅलंट आणि निरीक्षक सदस्य म्हणून काम करणारे इतर दोन उच्च अधिकारी असणार आहेत. जोपर्यंत लढाई सुरू आहे तोपर्यंत युद्धाशी संबंधित नसलेले कोणतेही कायदे किंवा निर्णय सरकार पारित करणार नाही. तसंच, लेबनॉनमधून इस्रायली हवाई हद्दीत संशयास्पद घुसखोरी झाल्याचंही वृत्त समोर आलं आहे.

Story img Loader